No matter how much fun the kids have, don't raise your hand against them by mistake, otherwise ... parents will have to go to jail

मुलांना मारहाण करून त्यांच्यात कोणतीही सुधारणा होत नाही. उलट, त्यांचं वागणं अधिक हिंसक होतं. याचा पुरावाही सापडला आहेत, याचा दाखला देत ब्रिटनमधील काही तज्ज्ञांनी देशातील मुलांवर हात उचलणे बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे.

    लंडन : अनेक देशात कायद्यांचे स्वरुप वेगवेगळे असते. आई-वडिलांची हेळसांड करणाऱ्या मुलांना धडा शिकविणारे जसे कायदे आहेत, त्याचप्रमाणे लहान मुलांवर हात उचलणाऱ्या आईवडिलांविरोधातही जगातील अनेक देशात कायदे आहेत. मुलाला मारताना पकडले गेल्यास तुरुंगात जाण्याचीही वेळ येते. या कायद्याचा आता युरोपातील अनेक देशांत समावेश करण्यात आला असतानाच ब्रिटनमध्येही देखील हा कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली असून लहान मुलांवर हात उचलणाऱ्या आईवडिलांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जात आहे. सद्यस्थितीत इंग्लंडसह चार युरोपिय देशांमध्ये हात उचलणे बेकायदेशीर आहे.

    मुलांना मारहाण करून त्यांच्यात कोणतीही सुधारणा होत नाही. उलट, त्यांचं वागणं अधिक हिंसक होतं. याचा पुरावाही सापडला आहेत, याचा दाखला देत ब्रिटनमधील काही तज्ज्ञांनी देशातील मुलांवर हात उचलणे बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे.

    युरोपमधील बऱ्याच देशांमध्ये पालक आपल्या मुलांवर हात उचलू शकत नाहीत. परंतु इंग्लंडमध्ये विशिष्ट परिस्थितीत मुलांना शिक्षा देण्यासाठी याला परवानगी आहे.

    स्कॉटलंडमध्ये 16 वर्षाच्या मुलांना शिक्षा देण्यासाठी काही कायदे बनविण्यात आले असून वेल्समध्येही अशा प्रकारचे काही कायदे राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या मते मारण्यामुळे मुलांवर चांगला परिणाम होत नाही. याउलट ती अधिकच आक्रमक होतात.

    लहान मुलांना आईवडिलांद्वारे झालेल्या मारहाणीच्या परिणामांचे गेल्या 20 वर्षांपासून विश्लेषण केले जात आहे. या दरम्यान करण्यात आलेल्या संशोधनात मुलांवरील हिंसाचाराच्या परिणामांचाही अभ्यास करण्यात आला. 16 वर्षे वयाखालील मुलांना मारहाण झाल्यास ते मोठे झाल्यावर आक्रमक व समाजासाठी धोकादायक ठरले असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. दरम्यान, चापट मारणे गैर नाही परंतु शारीरिक शिक्षा मुलांसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठीही फायदेशीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.