सर्व देशांनी अफगाणिस्थानसाठी आपल्या सीमा खुल्या कराव्यात ‘या’ नोबल पुरस्कार विजेतीने केले आवाहन

अफगाणी नागरिकांना मदत करण्यासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मलाला युसूफजई आव्हान केले आहे. अफगाणिस्तानमधील महिला, अल्पसंख्यांक यांच्याबाबत चिंता व्यक्त करत तिने आवाहन केले आहे

    तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर , भयभीत झालेल्या सर्वसामान्य नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबान्यांच्या भीतीपोटी पळ काढत असताना बचाव कार्याच्या विमानातूनही पडल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे, इतकंच नव्हेतर विमानतळावर हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होत आहेत.

    अफगाणिस्थानच्या या स्थितीबाबत सर्व जगातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अफगाणी नागरिकांना मदत करण्यासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मलाला युसूफजई आव्हान केले आहे. अफगाणिस्तानमधील महिला, अल्पसंख्यांक यांच्याबाबत चिंता व्यक्त करत तिने आवाहन केले आहे की, जागतिक नेत्यांना तत्काळ शस्त्रसंधी करण्याचे तसेच निर्वासितांसाठी सीमा खुल्या कराव्या असे म्हटले आहे. मलाला युसूफजई यांनी ट्विट करत हे आवाहन केले आहे.