उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन कोमात, बहीणीच्या हाती दिली सत्ता

दिवंगत नेते किम डे जंग यांच्या काळात राजकीय कामकाज सचिव म्हणून काम पाहणाऱ्या चांग सॉंग मीन यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की उत्तर कोरियाचा (North korea) कोणताही नेता कधीच आपली सत्ता दुसऱ्याला देत नाही. जेव्हा त्या नेत्याला गंभीर आजार होतो किंवा तख्तापालट होते तेव्हाच त्याची सत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्याकडे हस्तांतरीत केली जाते, असे चांग यांनी म्हटले आहे.

उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन कोमात गेला असल्याचे समजते आहे. त्यामुळे त्याची बहीण किम यो-जोंग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबी हाताळण्याची तयारी करीत असल्याचे माहिती मिळाली आहे. दिवंगत दक्षिण कोरियाचे नेते किम डे-जंगचे माजी सहकारी चांग सॉंग मीन यांनी किम जोंगच्या कोमामध्ये जाण्याविषयी एक पोस्ट केली आहे.

दिवंगत नेते किम डे जंग यांच्या काळात राजकीय कामकाज सचिव म्हणून काम पाहणाऱ्या चांग सॉंग मीन यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की उत्तर कोरियाचा (North korea) कोणताही नेता कधीच आपली सत्ता दुसऱ्याला देत नाही. जेव्हा त्या नेत्याला गंभीर आजार होतो किंवा तख्तापालट होते तेव्हाच त्याची सत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्याकडे हस्तांतरीत केली जाते, असे चांग यांनी म्हटले आहे.

चांग यांनी असा दावा केला आहे की. मळालेल्या माहितीनुसार सध्या किम जोंग-उन कोमामध्ये आहेत. सध्या ते जिवंत आहेत, ”तसेच एका वृत्तानुसार उत्तर कोरियामध्ये संपूर्ण उत्तराधिकारी संघटना स्थापन केलेली नाही आणि म्हणूनच किम यो-जोंग यांना समोर आणले जात आहे. कारण हे पद जास्त काळ रिक्त ठेवता येत नाही.
दक्षिण कोरियन दैनिक, दक्षिण कोरीयन डेलीच्या वृत्तानुसार, सोलच्या हेरगिरी एजन्सीने बंद दरवाजाच्या आड यंत्रणेने खासदारांना अशी माहिती दिली की किमने तिच्या सर्वात विश्वासार्ह मित्रांसोबत हक्क आणि जबाबदारी सामायिक केली आहे.

यापूर्वीही किम जोंग- उनच्या प्रकृतीसंदर्भात बातम्या आल्या आहेत त्यानंतर त्यांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या चित्रांमध्ये ते बारीक दिसत होते, परंतु अहवालानुसार चांग यांनी त्या चित्रांचे वर्णन जुने फोटो असल्याचे केले आहे.