कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश

उत्तर कोरियात कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी हुकूमशहा जोंग उनकडून अनेक उपाय योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

    कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उत्तर कोरीयाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उनने (Kim Jong Un)सर्व कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचा कृर आदेश दिला आहे. कारण कबूतरं आणि मांजरं चीनच्या सीमेच्या माध्यमाने कोरोना व्हायरस पसरवतात, असे उनचे म्हणणे आहे. उत्तर कोरियात कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी हुकूमशहा जोंग उनकडून अनेक उपाय योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

    उत्तर कोरियाच्या हुकूनशहाचा अभूतपूर्व आदेश –

    कोरोनाला लगाम घालण्याच्या उपायांत, एक आदेश, भटक्या मांजरांना मारणे आणि चीनच्या सीमेतून देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्षाला गोळी घालणे, असाही आहे. नुकतेच सीमेजवळील हेसन येथे एका कुटुंबाला शिक्षा देण्यात आली होती.

    आपल्या घरात मांजर पाळण्यासाठी त्यांना 20 दिवस आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात आले होते. सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.