उत्तर कोरियाचा किम जोंग उनचा अजब नियम ; स्किनी, फाटक्या जीन्स तसेच फॅशनेबल हेअरस्टाईल घातली बंदी

उ. कोरियात सरकारने १५ प्रकारचे हेअरकट ठरवून दिले आहेत. त्याबाहेर वेगळा हेअरकट करणे कायद्याविरोधात आहेत. 'मुलेट' हा हेअरकटचा नवा ट्रेंड तरुणाईत विशेष लोकप्रिय आहे. यात पुढचे केस छोटे ठेऊन मागचे केस मोठे, लांब ठेवले जातात. कोरियात कान, नाक वा शरीराच्या इतर अवयवांवर पिअर्सिंग म्हणजे टोचून घेण्यास बंदी आहे.

    उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन कायम आपल्या विचित्र वर्तनासाठी ओळखले जातात, सातत्याने देशातील जनतेवर अनेक बंधनेघालताना दिसतात. नौकेचा त्यांनी देशात स्किनी, फाटक्या जीन्स , तसेच फॅशनेबल हेअरस्टाईल करण्यावर बंदी घातली आहे. ताकाचा नव्हेतर या बंधनाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला कडक शिक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

    स्किनी, फाटक्या जीन्स, फॅशनेबल हेअरस्टाईल ही भांडवलशाही लाईफस्टाईलचा वाढता प्रभाव या दृष्टीकोनातून पहिली जात आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीचा युवा पिढीवर परिणाम होईल आणि त्यामुळे आपल्या सत्तेला धोका निर्माण होईल अशी भीती किम जोंग उनच्या मनात असल्याने ही बंधने घालण्यात आली आहेत.
    उ. कोरियात सरकारने १५ प्रकारचे हेअरकट ठरवून दिले आहेत. त्याबाहेर वेगळा हेअरकट करणे कायद्याविरोधात आहेत. ‘मुलेट’ हा हेअरकटचा नवा ट्रेंड तरुणाईत विशेष लोकप्रिय आहे. यात पुढचे केस छोटे ठेऊन मागचे केस मोठे, लांब ठेवले जातात. कोरियात कान, नाक वा शरीराच्या इतर अवयवांवर पिअर्सिंग म्हणजे टोचून घेण्यास बंदी आहे.