अणवस्त्रे नाही तर अंतराळात भारतीय सैन्याच्या उपस्थितीनेच पाकिस्तानला भरली धडकी, नवीन धोके ध्यानात घेता घेत आहे बैठका

पाकिस्तानला या घटनाक्रमांचे उत्तर द्यावेच लागेल आणि त्याशिवाय त्याचं समाधानच होऊ शकत नाही. या प्रश्नाबाबत सरकार चिंतेत आहे आणि सातत्याने बैठकांच्या माध्यमातून रणनितीवर चर्चा करत असल्याचे पॅनलमधील सदस्यांनी सांगितले.

  इस्लामाबाद : पाकिस्तानने केलेल्या अणवस्त्र चाचणीला २३ वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानने भारताच्या अणवस्त्र चाचणीला उत्तर म्हणून ही खेळी खेळली होती आणि आज भारतापेक्षा अधिक अणवस्त्रे आज पाकिस्तानकडे आहेत. भलेही अणवस्त्र शस्त्रास्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान भारताशी स्पर्धा करत आहे, पण तो अंतराळातील प्रकरणी भारतापेक्षा कैक मैल मागे आहे आणि यामुळेच पाकिस्तानातील राज्यकर्ते अनेकदा अकांड-तांडव करत असतात.

  अंतराळ क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल

  भारत अंतराळ क्षेत्रात जगातील प्रमुख शक्तीशाली देशांपैकी एक आहे. यामुळे पाकिस्तानच्या मनात नेहमीच असुरक्षिततेची भावना पाहायला मिळते. आता तर पाकिस्तानच्या अणवस्त्र चाचणीला २३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानच्या अन्य वैज्ञानिकांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता, या ठिकाणी त्यांची चिंता अधिक उघड झाल्याचे पाहायला मिळाले.

  परिसंवादाचे आयोजन

  पाकिस्तानातील प्रमुख मीडिया संस्था डॉनच्या मते, ‘Pakistan’s Quest for Peace and Strategic Stability in South Asia’ नामक एका परिसंवादाचे आयोदन करण्यात आले होते, ज्यात दोन पॅनलिस्ट, रणनिती योजना प्रभागाचे प्रमुख सल्लागार जमीर अकरम आणि परराष्ट्र मंत्रालयाचे महानिर्देशक शस्त्र नियंत्रण आणि निरस्त्रीकरण कामरान अख्तर यांनी सहभाग घेतला. या परिसंवादात भारताच्या पाकिस्तान समोर असलेल्या आव्हानांविषयी चर्चा झाली.

  भारताच्या तुलनेत मागे पडल्याने पाकिस्तानच्या चिंतेत भर

  या कार्यक्रमात पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताद्वारे (India) अंतराळात (Space) आणि आर्टिफिशियल इंटेलिजंस (Artificial Intelligence) च्या सैनिकीकरणाने पाकिस्तानच्या (Pakistan) सुरक्षेसाठी एक येणाऱ्या काळातील धोका असे संबोधले आहे. या परिसंवादातील चर्चेदरम्यान, पॅनेलच्या सदस्यांनी या प्रदेशातील ‘कमकुवत’ सामरिक स्थैर्य आणि भारताच्या आक्रमक पवित्राबद्दलच्या त्यांच्या चिंतेचा पुनरुच्चार केला.

  पाकिस्तान खूपच पिछाडीवर

  चर्चेतील पॅनलिस्ट सदस्यांनी पाकिस्तानसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर जोर दिला, याकडे आता आणखी दुर्लक्ष करता येणार नसल्याचे सांगितले. राजदूत अक्रम यांनी नमूद केले की, अमेरिकेच्या पाठिंब्याने आपल्या शस्त्रागारात सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि प्राणघातक स्वायत्त शस्त्रे – युद्धाच्या नव्या तंत्रांचे एकत्रिकरण करण्याचे काम भारत करत आहे. पाकिस्तानने या घडामोडींना प्रतिसाद द्यावा लागेल आणि ते आत्मसंतुष्ट राहू शकत नाहीत यावर त्यांनी भर दिला. या प्रश्नांबाबत सरकार चिंतेत आहे आणि वारंवार बैठकीद्वारे रणनीतींवर चर्चा केली जात असल्याचे पॅनेलचे सदस्य म्हणाले.

  Not a nuclear weapon but the presence of Indian troops in Militarisation Of Space is a shock to Pakistan, new threats are being considered says experts