now leopard infected with corona, Quarantine done to museum animals

या बिबट्याला श्वसनासंबंधी आजार असल्याचे दिसून आले होते. यामुळे त्याच्यावर उपचार करताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. या बिबट्याला इतर प्राण्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : कोरोना संसर्ग (Corona Virus) वेगाने पसरत आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांना कोरोनाचील लागण झाली आहे. मध्यांतरी प्राण्यांनाही कोरोना झाल्याची अफवा पसरत होती. परंतु आता अमेरिकेच्या प्राणी संग्रहालयात एख बिबट्या कोरोना पॉजिटिव्ह (leopard infected)  आढळल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेतील लुईसिया येथे असलेल्या प्राणिसंग्रहलयातील (animals) बिबट्याला कोरोनाची लागण झाली आहे.

या बिबट्याला श्वसनासंबंधी आजार असल्याचे दिसून आले होते. यामुळे त्याच्यावर उपचार करताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. या बिबट्याला इतर प्राण्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.

कोरोना पॉजिटिव्ह बिबट्या बर्फाळ प्रदेशात आढळणारा आहे. त्याला एका लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.