Occupied Afghanistan but here ... the first blow to the Taliban; 300 terrorists killed in Panjshir Valley

जशीरमधील एका सापळ्यात तालिबानी अडकले. जवळपास 300 तालिबानी ठार झाल्याचे वृत्त आहे. तर, तालिबानने हे वृत्त फेटाळून लावले आहे. तालिबानने कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाहच्या नेतृत्वात पंजशीरवर हल्ला करण्यासाठी शेकडो तालिबानींना पाठवले होते. मात्र, बागलान जवळील अंदराब खोऱ्यात सापळा लावून बसलेल्या पंजशीरच्या फौजांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये 300 तालिबानी ठार झाल्याचे समोर आले. त्याशिवाय तालिबानींची रसदही तुटली असल्याचे समोर आले आहे. बागलान प्रांतातही अनेक तालिबानींना कैद करण्यात आली आहे.

  काबुल : अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानला पंजशीर प्रांतावर ताबा मिळवता आला नाही. पंजशीर प्रांतावर ताबा मिळविण्यासाठी तालिबानने मोहीम आखली आहे. तालिबानने आपले बंडखोर पंजशीरवर हल्ला करण्यास पाठविले आहे. मात्र, पंजशीरमधील तालिबानविरोधकांनी त्यांना मोठा झटका दिला आहे. पं

  जशीरमधील एका सापळ्यात तालिबानी अडकले. जवळपास 300 तालिबानी ठार झाल्याचे वृत्त आहे. तर, तालिबानने हे वृत्त फेटाळून लावले आहे. तालिबानने कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाहच्या नेतृत्वात पंजशीरवर हल्ला करण्यासाठी शेकडो तालिबानींना पाठवले होते. मात्र, बागलान जवळील अंदराब खोऱ्यात सापळा लावून बसलेल्या पंजशीरच्या फौजांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये 300 तालिबानी ठार झाल्याचे समोर आले. त्याशिवाय तालिबानींची रसदही तुटली असल्याचे समोर आले आहे. बागलान प्रांतातही अनेक तालिबानींना कैद करण्यात आली आहे.

  स्वत:ला अफगाणिस्तानचा कार्यवाहक राष्ट्रपती घोषित करणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट केले आहे. अंदराब खोऱ्यात अडकल्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर तालिबानी त्यातून बाहेर पडले. त्यानंतर आता एक दिवसानंतर तालिबानने पंजशीरच्या मुख्य मार्गावर आपल्या फौजा तैनात केल्या आहेत. या दरम्यान, सलांग महामार्गदेखील विद्रोही गटांनी बंद केल्याची माहिती सालेह यांनी दिली.

  पंजशीरमधील विद्रोही गटांचे नेतृत्व करणारे अहमद मसूद यांनी शरणागती पत्करणार नसल्याचे म्हटले. आम्ही तालिबानसोबत युद्ध करण्यास तयार आहोत. आमचे 10 हजारांहून अधिक लोक तालिबानशी दोन हात करण्यास तयार आहेत. तालिबानने आमच्यासोबत संघर्ष न केल्यास बरे होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मसूद यांनी वडिलांच्या मार्गावर चालणार असून तालिबानसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले.

  पंजशीर खोऱ्यातून सालेह यांनी तालिबानविरोधात मोहीम सुरू केली आहे. अशातच तालिबानने एक मोठी घोषणा केली आहे. तालिबानने गनी आणि सालेह यांना माफी देणार असल्याची घोषणा केली आहे. हे दोघेही काबूलमध्ये येऊ शकतात, अशी घोषणाही तालिबानने केली आहे. तालिबान नेता खलील उर रहमान हक्कानीने सांगितले की, अशरफ गनी, सालेह आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांच्यासोबत तालिबानचे कोणतेही शत्रुत्व नाही. आम्ही गनी, सालेह आणि मोहिबला माफ केले असल्याचे हक्कानीने सांगितले.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]