जो बायडेन यांनी जाहीरपणे टोचून घेतली कोरोनाची लस, नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी थेट प्रसारण

क्रिस्टियन केअर हॉस्पिटलमधील नर्सच्या हस्ते बायडेन यांनी ही लस टोचून घेतली. अमेरिकेने फायजर कंपनीच्या लसीला मान्यता दिली असून त्याचं सार्वजनिक वितरण सुरू केलंय. या लसीबाबत सध्या जगभरात वेगवेगळे मतप्रवाह असून अनेक देशांनी या लसीच्या परिणामांबाबत साशंकता व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांच्या मनात कुठलीही शंका राहू नये, यासाठीच जो बायडेन यांनी लस टोचून घेतल्याच्या क्षणाचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय अमेरिकी प्रशासनाने घेतला असल्याचे समजते.

अमेरिकेचे उगवते अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी जाहीररित्या कोरोनाची लस टोचून घेतली. बायडेन लस टोचून घेत असल्याच्या क्षणाचं सर्व वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रसारण करण्यात आलं. अमेरिकेने निवड केलेली लस ही विश्वासार्ह असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला.

क्रिस्टियन केअर हॉस्पिटलमधील नर्सच्या हस्ते बायडेन यांनी ही लस टोचून घेतली. अमेरिकेने फायजर कंपनीच्या लसीला मान्यता दिली असून त्याचं सार्वजनिक वितरण सुरू केलंय. या लसीबाबत सध्या जगभरात वेगवेगळे मतप्रवाह असून अनेक देशांनी या लसीच्या परिणामांबाबत साशंकता व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांच्या मनात कुठलीही शंका राहू नये, यासाठीच जो बायडेन यांनी लस टोचून घेतल्याच्या क्षणाचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय अमेरिकी प्रशासनाने घेतला असल्याचे समजते.

काळा फूल शर्ट घालून बसलेल्या जो बायडेन यांनी आपल्या डाव्या हातावर लस टोचून घेतली. विशेष म्हणजे ही लस लवकरात लवकर बाजारात आणल्याबद्दल त्यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची स्तुती करत त्यांचे आभारही मानले. ही लस टोचून घेण्याची नागरिकांची मानसिक तयारी व्हावी आणि लस टोचून घेताना त्यांच्या मनात कुठलीही शंका राहू नये, यासाठीच आपण हे करत असल्याचं बायडेन म्हणाले.