old-man-dance-video

सोशल मीडियावर एका नाचणाऱ्या वृद्ध माणसाचा व्हिडिओ खूप व्हायरल (old man dancing video viral)झाला आहे. या व्हिडिओमध्ये म्हातारा माणूस एकदम बिनधास्तपणे डान्स करत आहे. लोकांना हा व्हि़डिओ खूप आवडला आहे.

    सोशल मीडियावर नेहमी काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर काही व्हिडिओ असे असतात ज्याची आपण कधीही कल्पना केलेली नसते.सध्या सोशल मीडियावर एका नाचणाऱ्या वृद्ध माणसाचा व्हिडिओ खूप व्हायरल (old man dancing video viral)झाला आहे. या व्हिडिओमध्ये म्हातारा माणूस एकदम बिनधास्तपणे डान्स करत आहे. लोकांना हा व्हि़डिओ खूप आवडला आहे.

    सोशल मीडियावर हा व्हिडिओ आयपीएस ऑफिसर दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वत:च्या सहवासाचा आनंद घ्या. कुणीही आपल्याला बघत नाहीये असा विचार करुन नाचा.” या व्हिडिओमध्ये एक वयस्कर माणूस जॅकेट,पॅन्ट,शूज आणि टोपी घालून लोकांसमोर पार्कमध्ये बिनधास्त नाचत आहे.तो माणूस आपल्या डान्समध्ये इतका गुंग झाला आहे की त्याला कशाचीही फिकीर नाही.