
नेपाळचे पंतप्रधान आणि चीनचे खंदे समर्थक मानल्या जाणारे के. पी. शर्मा ओली यांनी जिनपिंग सरकारला थेट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र आहेत, असं ओली यांनी म्हटलं आहे. नेपाळला स्वत:चं स्वातंत्र्य प्रिय असून आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असंही ओली यांनी म्हटलं आहे. भारताचे कौतुक करताना कोणताही तिसरा देश आमच्यामध्ये येऊ शकत नाही असं म्हटलं आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.
काठमांडू (Kathamandu). नेपाळचे पंतप्रधान आणि चीनचे खंदे समर्थक मानल्या जाणारे के. पी. शर्मा ओली यांनी जिनपिंग सरकारला थेट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र आहेत, असं ओली यांनी म्हटलं आहे. नेपाळला स्वत:चं स्वातंत्र्य प्रिय असून आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असंही ओली यांनी म्हटलं आहे. भारताचे कौतुक करताना कोणताही तिसरा देश आमच्यामध्ये येऊ शकत नाही असं म्हटलं आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.
कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक आमचेच
विनो या वृत्तवाहिनीला ओली यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश नेपाळचा भाग असल्याचा उल्लेख केला आहे. आम्ही चीन किंवा भारताच्या प्रदेशावर दावा करण्याच्या परिस्थितीत नसलो तरी आमच्या भूप्रदेशावर आम्ही नक्कीच दावा करणार. मला वाटतं २०२१ हे असं वर्ष असेल की जेव्हा आम्ही भारत आणि नेपाळमध्ये कोणताच वाद नसल्याची घोषणा करु, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला.
वादावर तोडगा काढण्याची गरज
ओली यांनी भारत आणि चीनदरम्यान सुरु असणाऱ्या वादावर तोडगा काढण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. आम्ही या दोन्ही देशांमधील वाद सोडवण्यासाठी मदत करु शकलो तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, असं ओली यांनी म्हटलं आहे. ओली यांच्या कार्यकाळात नेपाळने जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये भारत नेपाळ सीमेवरील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश नेपाळचा भाग असल्याचे दाखवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे चीनने हुमला येथे नेपाळच्या सीमेजवळचा बराच मोठा भाग बळकावला. आम्ही आमच्या स्वातंत्र्याबद्दल आणि सर्वभौमत्वासंदर्भात कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे ओली यांनी म्हटलं आहे.