पाकिस्तानात स्फोट करुन उडवण्यात आली लष्कराची गाडी -१ ठार, १० जण जखमी

पाकिस्तानातील(blast in pakistan) वर्दळीचा रस्ता असल्याने निमलष्करी दलाची गाडी हळूहळू गर्दीतून वाट काढत होती. लष्कराची गाडी मोटारसायकलजवळ आल्यानंतर लगेच स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

    कराची: पाकिस्तानच्या(pakistan) कराची येथे निमलष्करी दलाची एक गाडी स्फोटाच्या(blast in pakistan) सहाय्याने उडविण्यात आली. यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. या स्फोटासाठी एका मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता. निमलष्करी दलाची गाडी जवळ आल्यानंतर स्फोटकांनी भरलेल्या या मोटारसायकलचा रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने स्फोट करण्यात आला. बलोच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

    कराचीमधील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या ओरंगी परिसरामध्ये उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकलवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यामुळे स्फोटात घटनास्थळी उपस्थित असणारे काही नागरिकही जखमी झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यामध्ये स्फोटाच्या पाच मिनिटे आधी एका व्यक्तीने रस्त्यावर मोटारसायकल उभी केल्याचे दिसत आहे. हा वर्दळीचा रस्ता असल्याने निमलष्करी दलाची गाडी हळूहळू गर्दीतून वाट काढत होती. लष्कराची गाडी मोटारसायकलजवळ आल्यानंतर लगेच स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे समजते.