अमेरिकेत खुलेआम गोळीबार, बागेत बसलेल्या एकाचा मृत्यू, सहा जण जखमी, बायडेन यांनी दिली ही प्रतिक्रिया

अमेरिकेतील टेक्सास भागातल्या एका पार्कमध्ये एक माथेफिरू बंदूक घेऊन दाखल झाला. बागेत गर्दीच्या वेळी तो तिथल्या एका बाकावर बसून राहिला. हळूहळू गर्दी वाढत गेली. बऱ्यापैकी गर्दी जमल्यानंतर त्यानं अचानक आपल्या बंदुकीतून स्वैर आणि अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. या गोळीबारात पार्कमध्ये बसलेल्या एका नागरिकाचा जीव गेला, तर सहाजण जखमी झाले. 

    अमेरिकेतील टेक्सास भागात अचानक गोळीबार झाल्याने खळबळ उडालीय. एका माथेफिरूच्या या कृत्यामुळे एका नागरिकांना हकनाक आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तर इतर नागरिक जखमी झालेत.

    अमेरिकेतील टेक्सास भागातल्या एका पार्कमध्ये एक माथेफिरू बंदूक घेऊन दाखल झाला. बागेत गर्दीच्या वेळी तो तिथल्या एका बाकावर बसून राहिला. हळूहळू गर्दी वाढत गेली. बऱ्यापैकी गर्दी जमल्यानंतर त्यानं अचानक आपल्या बंदुकीतून स्वैर आणि अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. या गोळीबारात पार्कमध्ये बसलेल्या एका नागरिकाचा जीव गेला, तर सहाजण जखमी झाले.

    पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या इसमाला जिवंत पकडलं असून त्याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून लवकरच त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ही व्यक्ती माथेफिरू असून वेडाच्या भरात त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. मात्र खरोखरच ही व्यक्ती मानसिक रुग्ण आहे की यातून वाचण्यासाठी मनोरुग्ण असल्याचं नाटक करतेय, याचा पोलीस सध्या छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. घटनेतील जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

    दरम्यान, गोळीबार करणं ही एक साथच असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिलीय. एखाद्या साथीप्रमाणे ही मनोवृत्ती वाढत चालली असून त्यावर वेळीच ताबा मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे अंदाधुंद गोळीबार कऱणाऱ्यांचं प्रमाण वाढत असून सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय.