लस घेतली तरच विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार; अमेरिकेतील विद्यापीठाचा निर्णय, भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी जे नवे किंवा जुने विद्यार्थी कँपसमध्ये येतील, त्यांना लशीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक असेल. हा नियम पदवीधर, पदव्युत्तरसह सर्वच विद्यार्थ्यांना लागू असेल.

    वॉश्गिंटन :  जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात सर्वत्र लसीकरण मोहिम राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेचा परिणाम आता शिक्षणावरही दिसून येत आहे. अमेरिकेतील वेंडरबिल्ट विद्यापीठाने, लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठात प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा केली आहे.