जपानमध्ये बर्ड फ्लूचा कहर

टोकीओ : गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. अशा स्थितीत जपानमध्ये मात्र एका नवीन आजाराने मान वर काढली आहे. हा आजार प्राण्यांमधून पसरणारा बर्ड फ्लू आहे. बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता जपानमधील चीबा प्रांतामध्ये 11 लाख कोंबड्यांना मारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. चीबा हा जपानमधील १३वा असा प्रदेश आहे जिथे एच फाइव्ह हा बर्ड फ्लू वेगाने पसरला आहे.

टोकीओ : गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. अशा स्थितीत जपानमध्ये मात्र एका नवीन आजाराने मान वर काढली आहे. हा आजार प्राण्यांमधून पसरणारा बर्ड फ्लू आहे. बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता जपानमधील चीबा प्रांतामध्ये ११ लाख कोंबड्यांना मारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. चीबा हा जपानमधील १३वा असा प्रदेश आहे जिथे एच फाइव्ह हा बर्ड फ्लू वेगाने पसरला आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जपानने ११ लाख ६० हजार कोंबड्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील अधिकाऱ्यांनी चीबामधील १० किमीपर्यंतचा परिसर क्वारंटाईन केला असून या ठिकाणी कोंबड्या आणि अंडी न पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीबासह कगवा, फुकुओका, हयोगो, मियाजाकी, हिरोशिमा, नारा, ओइता, वकायमा, शिगा, तोकुशिमा आणि कोचि या प्रांतांमध्येही बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जपानमध्ये ३४ लाख कोंबड्यांना मारून टाकण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जपानच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ११ हजार पक्ष्यांना मारून त्यांना दफन केले आहे. हा निर्णय दक्षिण पश्चिम जपानच्या शिगा प्रातांतील हिगाशीओमी शहरातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये अंड्यामुळे एवियन इन्फुंएंजा पसरल्यानंतर घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कागवा प्रांतातही बर्ड फ्लू चा प्रकोप पाहायला मिळत आहे. या आजाराच्या प्रसाराची सुरूवात मागच्या महिन्यात झाली होती.