Outbreak of new bird flu in Japan; Panic in poultry farm

बर्ड फ्लूच्या या नव्या संकटाचा निपटारा करण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टोचिगी प्रांतातील विविध पोल्ट्री फार्ममधील 77,000 कोंबड्यांच्या कत्तलीचे आदेश देण्यात आले आहे.

    टोकियो : जापानमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. टोचिगी प्रांतात नव्या बर्ड फ्लूने कहर केला आहे. येथील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे.

    बर्ड फ्लूच्या या नव्या संकटाचा निपटारा करण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टोचिगी प्रांतातील विविध पोल्ट्री फार्ममधील 77,000 कोंबड्यांच्या कत्तलीचे आदेश देण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू प्रभावित पोल्ट्री फार्मच्या जवळील 3 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

    याचबरोबर 10 किलोमीटर परिसरात अंडी आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीवर प्रतिबंध लावण्यात आले होते. टोचिगी प्रांतापूर्वी जापानच्या चीबी, कगवा, फुकुओका, हयोगो, मियाजाकी, हिरोशिमा, नारा, ओयता, वकायमा, शिगा, तोकुशिमा आणि कोचीमध्येही बर्ड फ्लूचा फैलाव झाला होता.