नव्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ; देश सोडण्यासाठी लंडनच्या विमानतळावर लोकांची गर्दी

जगातल्या १८ देशांनी ब्रिटेनवरून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाने तर एक हप्त्यासाठी सर्व आंतराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी आणली आहे. मागच्या वर्षी चीनच्या विमानतळावर कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर ज्या प्रकारे स्थिती होती.

  • १८ देशांकडून ब्रिटनच्या उड्डाणांना बंदी

लंडन. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा नव्या रूपातील कोरोनाच्या प्रसाराने कहर केला आहे. ब्रिटनमधील आरोग्य तज्ञांना पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी जबाबदार असलेल्या विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडला आहे. नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा ७० टक्के जास्त संसर्गजन्य आहे असे वैज्ञानिक म्हणणे आहे. त्यामुळे येथील स्थानिकांनी देश सोडण्यासाठी एकाच झुंबड उडविली असून लंडनच्या हीथ्रो विमानतळावर हजारो लोकांनी गर्दी केली आहे.

या पार्श्वभूमीवर जगातल्या १८ देशांनी ब्रिटेनवरून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाने तर एक हप्त्यासाठी सर्व आंतराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी आणली आहे. मागच्या वर्षी चीनच्या विमानतळावर कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर ज्या प्रकारे स्थिती होती. तशीच स्थिती आता ब्रिटनमध्ये पाहायला मिळत आहे. भारतातही ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधील उड्डाणांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.