Outbursts against China in Myanmar; Ten factories on fire

म्यानमारमधील जवळपास 10 चिनी कंपन्या, कारखान्यांना आगी लावण्यात आल्या असून लूटपाटही करण्यात आली आहे. यामध्ये काही चिनी नागरिक जखमी झाले आहेत.

    यांगून : म्यानमारमध्ये लष्करशाहीविरोधात लोकशाही समर्थकांचे मोठे आंदोलन सुरू आहे. म्यानमारमधील लष्करशाहीला चीनचा पाठिंबा असल्याचा आरोप याआधीही आंदोलकांनी केला होता. आता आंदोलनकर्त्यांनी चिनी कंपन्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

    म्यानमारमधील जवळपास 10 चिनी कंपन्या, कारखान्यांना आगी लावण्यात आल्या असून लूटपाटही करण्यात आली आहे. यामध्ये काही चिनी नागरिक जखमी झाले आहेत.

    रविवारी लष्कराने केलेल्या गोळीबारात 39 आंदोलकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. चिनी दूतावासाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. चिनी दूतावासाने ही परिस्थिती अतिशय गंभीर असून आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    चिनी दूतावासाने चिनी कंपनी, आस्थापनांच्या संरक्षणासाठी लष्कराकडे विनंती केली आहे. चिनी नागरिकांच्या मालकीच्या दोन गारमेंट कारखान्यांना आग लावण्यात आली. तर, तिसऱ्या कारखान्याला आग लावण्यात आली असल्याचे म्हटले. परिस्थिती अतिशय गंभीर असून काहीजण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.