Imran Khan

भारतीय लष्करप्रमुखांचं दोन्ही देशांत जंगी स्वागत झाल्यामुळे पाकिस्तानातील विरोधी पक्ष पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका करत आहेत. जनरल नरवणे हे सौदी आणि युएईचा दौरा करणारे पहिले भारतीय लष्करप्रमुख ठरलेत. भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जनरल नरवणेंच्या या दौऱ्याचे फोटो अपलोड करण्यात आलेत.

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी नुकताच संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचा दौरा केला. दोन्ही देशात भारतीय लष्करप्रमुखांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हे बघून सध्या पाकिस्तानची झोप उडालीय.

भारतीय लष्करप्रमुखांचं दोन्ही देशांत जंगी स्वागत झाल्यामुळे पाकिस्तानातील विरोधी पक्ष पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका करत आहेत. जनरल नरवणे हे सौदी आणि युएईचा दौरा करणारे पहिले भारतीय लष्करप्रमुख ठरलेत. भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जनरल नरवणेंच्या या दौऱ्याचे फोटो अपलोड करण्यात आलेत.

माजी पंतप्रधान अब्बासींची इम्रान खान यांच्यावर टीका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधन आणि विरोधी पक्ष नेते शाहिद खाकन अब्बासी यांनी परराष्ट्र संबंधांच्या मुद्द्यावरून पाकिस्तान सरकारला धारेवर धरलंय. इतर देशांची परराष्ट्र नीती काय असावी, हे आपण ठरवू शकत नाही. मात्र आपल्या देशाच्या परराष्ट्र नितीबाबत तरी धोरण आखू शकतो, असं त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

सौदी अरेबियानं भारताशी संबंध ठेवावेत की नाही, हा त्या देशाचा प्रश्न आहे. इतर देशांची परराष्ट्र धोरणं आपण ठरवू शकत नाही. मात्र आपले आणि सौदी अरेबियाचे संबंध कसे आहेत, याचा मात्र आपण विचार करायला हवा. आपण इतर देशांशी संबंध कसे वाढवू शकतो, हे पूर्णतः पाकिस्तान सरकारच्या हातात असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानचे मंत्री सौदी अरेबियाविषयी जी वक्तव्यं करतात, त्यामुळे सौदीसोबतचे संबंध बिघडत असल्याचं ते म्हणाले.