भारत-तालिबान चर्चेमुळे पाकचा तीळपापड; इम्रानच्या एनएसएची आगपाखड

भारताने अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी कोणत्या नैतिकतेच्या आधारावर तालिबानसोबत बैठक केली, असा मोइद यांनी उपस्थित केला. तालिबानचे सदस्य दररोज मारले जावेत, अशी भारताची इच्छा आहे. तालिबानविरोधातील मोहिमेला भारताने आर्थिक मदत केली असून इतरही मदत दिली आहे. आता त्याच तालिबानसोबत भारतीय अधिकारी चर्चेसाठी कतारमध्ये दाखल झाले आहेत. ज्या तालिबान नेत्यांसोबत भारतीय अधिकाऱ्यांनी बैठक केली. ते मुर्ख नाहीत, असेही युसूफ यांनी म्हटले.

    इस्लामाबाद : अफगाणिस्तानमधील संभाव्य परिस्थितीतीबाबत भारतीय अधिकारी आणि तालिबानच्या नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेमुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसूफ यांनी भारताविरोधात आगपखाड केली आहे. कतारमध्ये भारत-तालिबान दरम्यान झालेल्या चर्चेवर टीका केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या महिन्यात दोनदा कतार दौरा केला. या दरम्यानच्या तालिबानसोबत चर्चा झाली असल्याचे म्हटले जाते.

    ‘ते’ मुर्ख नाहीत

    भारताने अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी कोणत्या नैतिकतेच्या आधारावर तालिबानसोबत बैठक केली, असा मोइद यांनी उपस्थित केला. तालिबानचे सदस्य दररोज मारले जावेत, अशी भारताची इच्छा आहे. तालिबानविरोधातील मोहिमेला भारताने आर्थिक मदत केली असून इतरही मदत दिली आहे. आता त्याच तालिबानसोबत भारतीय अधिकारी चर्चेसाठी कतारमध्ये दाखल झाले आहेत. ज्या तालिबान नेत्यांसोबत भारतीय अधिकाऱ्यांनी बैठक केली. ते मुर्ख नाहीत, असेही युसूफ यांनी म्हटले.

    पडद्यामागे कोणतीही चर्चा नाही

    अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमधून माघारी जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय अधिकाऱ्यांनी तालिबानाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याने पाकिस्तान चिंतेत नसल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, युसूफ यांनी भारतासोबत सध्या पडद्यामागे कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत करण्यासाठी भारताने आम्हाला संपर्क केला असल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये ऑगस्ट 2019 पूर्वीची स्थिती कायम ठेवावी, असे आम्ही भारताला सांगितले. आम्ही भारताच्या उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याचा दावाही त्यांनी केला.