पाकिस्ताननंही आणली PakVac नावाची कोरोना लस, कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी ?

पाकिस्ताननं ही लस बाजारात तर आणलीय पण ही लस कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी आहे? किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय? चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे? याबाबतची कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.

    कोरोना महामारीला रोखण्यासाठी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला जात आहे. बहुतेक देशांमध्ये आता सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोना विरोधी लस दिली जात आहे. यातच आता पाकिस्ताननंही स्वदेशी कोरोना लसीची निर्मिती केली आहे. पाकिस्ताननं या लसीला PakVac असं नाव दिलं आहे.

    पाकिस्ताननं ही लस बाजारात तर आणलीय पण ही लस कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी आहे? किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय? चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे? याबाबतची कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.

    पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर यांनी PakVac लस लॉन्च केली आहे. याशिवाय पाकिस्तान लवकरच कोरोनावरील महत्वपूर्ण औषध तयार करण्यासाठी सक्षम होणार आहे, असा दावा केला आहे. पाकिस्तानात तयार करण्यात आलेल्या या लसीची अतिशय काटेकोर पद्धतीनं चाचणी, गुणवत्ता आणि तपासणी झालेली आहे, असंही ते म्हणाले.