donkeys in pakistan

पाकिस्तानमध्ये(Pakistan) दरवर्षी १ लाख गाढवांची(Donkey) भर पडत असल्याचं २०२१च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या माहितीवरुन समोर आलं आहे. म्हशींच्या संख्येतही १० लाखांहून अधिक वाढ झाली आहे.

    पाकिस्तानमध्ये(Pakistan) यावर्षी ५० लाख गाढव असल्याची(Donkey Population Increasing In Pakistan) नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान हा गाढवांची सर्वाधिक संख्या असलेला जगातला तिसरा देश ठरला आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने केलेल्या सर्वेक्षणातून(Survey) ही माहिती समोर आली आहे.

    पाकिस्तानमध्ये दरवर्षी १ लाख गाढवांची भर पडत असल्याचं २०२१च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या माहितीवरुन समोर आलं आहे. म्हशींच्या संख्येतही १० लाखांहून अधिक वाढ झाली आहे. मेढ्यांची संख्याही ३१.२ मिलियनवरुन ३१.५ मिलियनवर पोहोचली आहे. पंजाबच्या पशुधन विभागाने पाकिस्तानातल्या प्राण्यांच्या संख्येत होणारी वाढ समोर आणली आहे.

    राज्याने प्राण्यांच्या मोफत उपचारासाठी रुग्णालयंही सुरु केली आहेत. मात्र प्राण्यांच्या संख्येत आता अनियंत्रित वाढ होऊ लागली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकट्या लाहोरमधली गाढवांची संख्या ४१ हजाराने वाढली. एका वर्षांत मेंढ्यांची संख्या ४ लाखाने वाढली. बकरी तसंच इतरही प्राण्यांच्या संख्येत झालेली अनियंत्रित वाढ झाल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्षी एकूण पशुधनात १.९ मिलियनची वाढ झाली आहे.

    बकऱ्यांकडून मिळणाऱ्या दुधापासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन केलं जातं. तर गाढवं ओझी वाहण्याच्या कामी येतात. त्याचबरोबर बांधकामासाठी लागणारं साहित्यही त्यांच्या माध्यमातून वाहून आणता येतं. एएनआयच्या एका अहवालानुसार ३५ हजार ते ५५ हजार किंमत असलेलं एक गाढव त्याच्या मालकाला दररोज एक हजार रुपयांचं उत्पन्न मिळवून देतं. गाढव चांगल्या किमतीला विकलंही जात असल्याची माहिती मिळाली आहे.