RSS

पाकिस्तानकडून(pakistan) पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(rashtriy swayamsewak sangh) ही एक हिंसक राष्ट्रवादी संघटना आहे,असा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी)(UNSC) व्यासपीठाचा उपयोग भारतविरोधी प्रचारासाठी आणि बेजबाबदार वक्तव्यांसाठी केला आहे.

दिल्ली: पाकिस्तानकडून(pakistan) पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(rashtriy swayamsewak sangh) ही एक हिंसक राष्ट्रवादी संघटना आहे,असा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी) व्यासपीठाचा उपयोग भारतविरोधी प्रचारासाठी आणि बेजबाबदार वक्तव्यांसाठी केला आहे. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचीही मागणी केली. तसेच पाकिस्तानने भाजपा आणि काश्मीरबाबतही संयुक्त राष्ट्रांत अनेक खोटी वक्तव्य करत, त्यांच्यावर आरोप केले आहे.

संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे राजदूत मुनिर अकरम यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जगभरातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवादी संघटना असा उल्लेख करण्याची मागणी केली. तसेच आपल्या भाषणा दरम्यान भाजपा आणि हिंदू-मुस्लीम यावरही त्यांनी वक्तव्य केले आहे.

दरम्यान, त्यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारावर आणि त्यांच्या परिस्थितीवर काहीही बोलण्यात आलेले नाही. भाजपा ही हिंदुत्वाची विचारधारा मानते. भाजपाकडून आपल्या देशातील मुस्लिमांना धमक्याही देण्यात येतात, असे वक्तव्यही मुनीर अकरम यांनी यावेळी केले. तसेच हिंसक राष्ट्रावादाचा उदय रोखण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यावेळी सूचनाही केल्या. पाकिस्तानने आपल्या सूचनांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे सर्व राष्ट्रांनी आपल्या देशातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच या संघटनांच्या विचारधारा, त्यात होणारी भरती आणि आर्थिक मदतीवरही तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.