Imran Khan

तालिबानने पाकिस्तान सरकारला जोरदार धक्का दिला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एका मुलाखतीदरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानसोबतचे (टीटीपी) प्रश्न स्वतः सोडवावेत, असा सल्ला दिला आहे. टीटीपी जर तालिबानला आपला नेता मानत असतील तर त्यांनी आमचे ऐकावे, असे आवाहनही मुजाहिद यांनी केले आहे.

    इस्लामाबाद : तालिबानने पाकिस्तान सरकारला जोरदार धक्का दिला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एका मुलाखतीदरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानसोबतचे (टीटीपी) प्रश्न स्वतः सोडवावेत, असा सल्ला दिला आहे. टीटीपी जर तालिबानला आपला नेता मानत असतील तर त्यांनी आमचे ऐकावे, असे आवाहनही मुजाहिद यांनी केले आहे.

    पाकिस्तानला एक दिवस तहरीक-ए-तालिबानशी चर्चा करावी लागेल. अफगाणिस्तान यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. मात्र, तालिबान अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरोधात वापरू देणार नाही, असा पुनरुच्चारही मुजाहिद यांनी केला. अफगाणिस्तानात शासन करणारे आगामी तालिबान सरकार यावर निर्णय घेईल, असे ते म्हणाले.