श्रीलंकेत बुरखाबंदीचा निर्णय; पाकचा संताप

धार्मिक कट्टरतावादाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता बुरखा परिधान करण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने श्रीलंका लवकरच बुरख्यावर निर्बंध घालणार असल्याची माहिती दिली होती. याव्यतिरिक्त 1 हजार इस्लामी शाळादेखील बंद केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावरून आता पाकिस्तानच्या उच्चायोगाने निषेध व्यक्त केला आहे.

    इस्लामाबाद : धार्मिक कट्टरतावादाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता बुरखा परिधान करण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने श्रीलंका लवकरच बुरख्यावर निर्बंध घालणार असल्याची माहिती दिली होती. याव्यतिरिक्त 1 हजार इस्लामी शाळादेखील बंद केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावरून आता पाकिस्तानच्या उच्चायोगाने निषेध व्यक्त केला आहे.

    श्रीलंकेच्या या निर्णयामुळे श्रीलंका आणि जगातिल अन्य मुस्लिम लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असे पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून सांगण्यात आले. याशिवाय पाकिस्तानने श्रीलंकेला धमकीही दिली.

    बुरख्यावर बंदी घातल्याने श्रीलंका आणि जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील. कोरोना महासाथीमुळे आधीच श्रीलंका अनेक समस्यांचा सामना करत आहे आणि आंतरराष्ट्रीय मंचावरही श्रीलंकेला आपल्या प्रतीमेबाबात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

    अशा आर्थिक कठीण परिस्थिती असतानाही सुरक्षेच्या नावाखाली विभाजनकारी पाऊल उचलल्याने अल्पसंख्यांकांचे मानवाधिकाबाबतचे प्रश्न अधिक वाढतील, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त साद खट्टाक बुरखा बंदीच्या एका वृत्ताला ट्वीट करत म्हटले.