पाकिस्तानला पुन्हा वाटतेय सर्जिकल स्ट्राईकची भीती, हे आहे कारण

सर्जिकल स्ट्राईकच्या शक्यतेबाबत पाकिस्तान सरकारनं कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी पाकिस्तानी माध्यमं जे दाखवतायत, त्यावरून ही भीती इम्रान खान सरकारच्या मनात असल्याचं स्पष्ट होतंय. सध्या भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकतो, अशी शक्यता पाकिस्तानमधील जियो न्यूजनं दिलीय.

पाकिस्तानला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची भीती वाटते आहे. ही भीती इतकी आहे की केवळ भीतीपोटी पाकिस्ताननं आपल्या सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

सर्जिकल स्ट्राईकच्या शक्यतेबाबत पाकिस्तान सरकारनं कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी पाकिस्तानी माध्यमं जे दाखवतायत, त्यावरून ही भीती इम्रान खान सरकारच्या मनात असल्याचं स्पष्ट होतंय. सध्या भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकतो, अशी शक्यता पाकिस्तानमधील जियो न्यूजनं दिलीय.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनुसार भारत-पाकिस्तान सीमेवर जोरदार तयारी सुरू आहे. सर्जिकल स्ट्राईकची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तानी सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकतो किंवा सीमेवर जोरदार कारवाई केली जाऊ शकते, असं पाकिस्तानी सूत्रांचं म्हणणं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरीचं प्रमाण वाढलंय. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आयएसआयच्या मदतीनं या कारवाया करत आहेत. यातील कारवायांवर पाकिस्तान सरकारचे काहीच नियंत्रण नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे या दहशतवादी कारवायांचा फटका बसू शकतो, याची जाणीव पाकिस्तान सरकारला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.