pakistan chief

भविष्यात आक्रमक कारवाई करण्यात चिनी रणगाडे अत्यंत उपयुक्त ठरेल असा दावा जनरल बाजवा यांनी केला. ते म्हणाले की, चिनी रणगाडे ही जगातील सर्वात आधुनिक रणगाड्यांपैकी एक आहे. हे हल्ल्यासाठी सर्व हाय-टेक उपकरणे तसेच सुरक्षा आणि संरक्षणासह सुसज्ज आहे.

लडाख : लडाखमधील भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख  (Pakistani army chief) जनरल कमर जावेद बाजवा यांनी बुधवारी पंजाब प्रांतातील फिल्ड फायरिंग रेंजला भेट दिली. यावेळी त्यांनी चीनच्या (Chin) तिसर्‍या पिढीतील मुख्य रणगाडा व्हीटी -४ च्या (Chinese tank)  कामगिरीचा आढावा घेतला. जनरल बाजवा म्हणाले की, पाक सैन्य प्रत्येक उदयोन्मुख आव्हान आणि प्रादेशिक धोका सामोरे जाण्यास तयार आहे. भारताचे नाव न घेता ते म्हणाले की जर देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वावर परिणाम झाला तर आम्ही योग्य प्रतिसाद देऊ.

भविष्यात आक्रमक कारवाई करण्यात चिनी रणगाडे अत्यंत उपयुक्त ठरेल असा दावा जनरल बाजवा यांनी केला. ते म्हणाले की, चिनी रणगाडे ही जगातील सर्वात आधुनिक रणगाड्यांपैकी एक आहे. हे हल्ल्यासाठी सर्व हाय-टेक उपकरणे तसेच सुरक्षा आणि संरक्षणासह सुसज्ज आहे. जनरल बाजवा म्हणाले की, पाक सैन्य प्रत्येक उदयोन्मुख आव्हाने आणि प्रादेशिक धोक्यांशी सामना करण्यास तयार आहे.