afganistan

पाकिस्तानच्या एका महिला नेत्याने काश्मीरबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्या महिलेचं नाव नीलम इर्शाद शेख असं आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. त्यामुळे तालिबान काश्मीरला सुद्धा जिंकून देतील, असं वक्तव्य नीलम यांनी केलं आहे. 

  तालिबानने अफगाणिस्तानच्या संपूर्ण शहरांवर कब्जा करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यानंतर पाकिस्तानने सुद्धा आता तालिबानला उघडपणे पाठिंबा देत तालिबान पाकिस्तानला काश्मीर जिंकून देतील, असा खळबळजनक दावा पीटीआयच्या पाकिस्तानी महिला नेत्याने केला आहे. या दाव्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफ आनंद साजरा करत असल्याचं माहिती मिळाली आहे.

  पाकिस्तानच्या एका महिला नेत्याने काश्मीरबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्या महिलेचं नाव नीलम इर्शाद शेख असं आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. त्यामुळे तालिबान काश्मीरला सुद्धा जिंकून देतील, असं वक्तव्य नीलम यांनी केलं आहे.

  कोण आहेत नीलम इर्शाद शेख ?

  इमरान खान यांंचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफच्या सदस्या नीलम इर्शाद शेख आहेत. त्यांनी एका पाकिस्तानी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वादग्रस्त विधान केलं आहे. तालिबानच्या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जवळचे संबंध असल्याचे मानले जात आहे.

  मुलाखतीत नीलम यांनी केलेलं वक्तव्य काय?

  इमरान खान सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानचा अभिमान वाढला आहे. तसेच तालिबान आमच्यासोबत आहे आणि इंशा अल्लाह आम्हाला काश्मीर जिंकून देण्यासाठी मदत करतील, असं वादग्रस्त विधान नीलम शेख यांनी केलं आहे.

  पुढे त्या म्हणाल्या की, भारताने आपले तुकडे केले आहेत आणि आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करणार आहोत. आपल्या सैन्याकडे सत्ता आहे, त्याचबरोबर सरकारकडेही शक्ती आहे. तालिबान आम्हाला पाठिंबा देत आहे कारण त्यांच्यावर अत्याचार होत असताना पाकिस्तानने त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता तो आम्हाला साथ देईल. असं नीलम शेख म्हणाल्या आहेत.

  दरम्यान, नीलम शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे काश्मीर जिंकून देण्यास तालिबान खरोखरच पाकिस्तानला पाठिंबा देणार का? की पाकिस्तान पुन्हा एकदा नवीन खेळी रचत आहेत. हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.