नात्याला काळिमा फासणारी घटना – पाकिस्तानातील मदरशामध्ये ‘त्या’ मौलानांनी विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करुन ३ वर्ष केला सेक्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पितळ उघडं पडलं

पाकिस्तानातील (Pakistan)एक वृद्ध मौलाना मुफ्ती अजीजुर रहमान यांचा सेक्स व्हिडिओ(Viral Sex Video Of Maulana) लिक झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मौलाना मदरशामधील(Madarsa) एका विद्यार्थिनीसोबत शारिरीक संबंध ठेवताना दिसत आहेत.

  इस्लामाबाद : पाकिस्तानातील (Pakistan)एक वृद्ध मौलाना मुफ्ती अजीजुर रहमान यांचा सेक्स व्हिडिओ(Viral Sex Video Of Maulana) लिक झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मौलाना मदरशामधील(Madarsa) एका विद्यार्थिनीसोबत शारिरीक संबंध ठेवताना दिसत आहेत. या व्हिडिओविषयी माहिती मिळाल्यानंतर लाहोर पोलिसांनी मुफ्ती अजीजुर रहमान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

  पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीने १७ जूनला मुफ्ती अजीजुर रहमान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. एफआयआरमध्ये तिने सांगितले की, तिला २०१३ मध्ये लाहोरच्या जामिया मंडुरूल इस्लामियामध्ये प्रवेश मिळाला होता. तिने असेही सांगितले की, परीक्षेच्या काळात मुफ्ती रहमान यांनी तिच्यावर आणि अन्य काही विद्यार्थ्यांवर दुसऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसवण्यात आल्याचे आरोप केले होते.या आरोपांनंतर त्या विद्यार्थिनीवर ३ वर्षांसाठी मदरशामधील परीक्षेला बसण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.

  पीडितेने सांगितले की, मदरशाच्या परीक्षेबाबतच्या निर्णयानंतर तिने मुफ्ती रहमान यांच्याकडे परीक्षेला बसू देण्यासाठी विनंती केली. मात्र त्यांनी निर्णय बदलला नाही. नंतर मुफ्ती रहमान यांनी तु माझ्याशी सेक्स करुन मला खूश केलेस तर मी काहीतरी करु शकेन,असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थिनीने मुफ्ती रहमान यांची मागणी मान्य केली.

  पीडित विद्यार्थिनी म्हणाली की, मुफ्ती रहमान यांनी सेक्सनंतर तिच्यावर करण्यात आलेले आरोप हटवण्याचं वचन दिले होते. इतकच नाही तर मुफ्ती यांनी विद्यार्थिनीला परीक्षेत पास करण्याचही आश्वासन दिलं होतं. गेल्या ३ वर्षांच्या काळात दर शुक्रवारी विद्यार्थिनीसोबत सेक्स करुनही मुफ्ती यांनी काहीच केले नाही. त्यांनी सेक्सची मागणी करत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

  पीडिता म्हणाली की, मदरसा व्यवस्थापनाकडे तिने मुफ्तींच्या विरोधात तक्रार केली. मात्र त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी तिला खोटं ठरवलं.त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने मुफ्तींचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि वकाफुल मदारिस अल अरब नाजिम यांना दाखवला. त्यानंतर मुफ्तींनी याचे परिणाम गंभीर होतील, अशी धमकी विद्यार्थिनीला दिली.

  ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगनंतर प्रशासनाने मुफ्तींना पदावरूव हटवले. दरम्यान मौलानांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.