पाकिस्तानची अवस्था दयनीय! दोन वेळचे खाणे झाले दुर्लभ ; इम्रान खान यांच्या चिंतेत वाढ

चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या जवळच्या मित्राचं उदाहरण देत म्हटलं की, जर देश सध्या आहे त्याच अवस्थेत राहिला तर अन्न सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनेल. इम्रान म्हणाले, “जर एखादा देश आपल्या लोकांना चांगला आहार देऊ शकत नसेल तर तो कधीच प्रगती करू शकत नाही.

    नवी दिल्ली : पाकिस्तान देशाची अवस्था दयनीय झाली असून पंतप्रधान इम्रान खान यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाकिस्तानची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली असून अन्नसुरक्षा हे पाकिस्तान पुढचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. याबाबत खुद्द इम्रान खान यांनी म्हटले आहे की, भविष्यात लोकांना अन्नटंचाईपासून वाचविण्यासाठी देशाने पावले उचलण्याची गरज आहे. पाकिस्तानमधील ४० टक्के मुले कुपोषणाला बळी पडल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

    काय म्हणाले इम्रान खान ? 
    इस्लामाबाद येथील शेतकरी परिषदेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, गेल्या वर्षी पाकिस्तानने ४० दशलक्ष टन गहू आयात केला. याचा परकीय चलन साठ्यावर वाईट परिणाम झाला होता, ज्याची आधीपासूनच कमतरता होती. इम्रान खान म्हणाले की, “पाकिस्तानसमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे.” ते म्हणाले की वेगाने वाढणार्‍या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे.

    चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या जवळच्या मित्राचं उदाहरण देत म्हटलं की, जर देश सध्या आहे त्याच अवस्थेत राहिला तर अन्न सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनेल. इम्रान म्हणाले, “जर एखादा देश आपल्या लोकांना चांगला आहार देऊ शकत नसेल तर तो कधीच प्रगती करू शकत नाही. जर १५-४० टक्के लोक भुकेले असतील तर याचा देशाच्या विकासावर मोठा परिणाम होईल. जो देश आपल्या लोकांना पुरेसा आहार देऊ शकत नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.