पाकिस्तानची नापाक चाल ! कुलभूषण जाधव प्रकरणाला अन्य खटल्यांशी जोडण्याचा प्रयत्न

हेरगिरीच्या कथित आरोपावरून पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या माजी भारतीय नौदल कर्मचारी कुलभूषण जाधव प्रकरणाच्या संदर्भात पुन्हा एकदा पाकिस्तानने नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.

हेरगिरीच्या कथित आरोपावरून पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या माजी भारतीय नौदल कर्मचारी कुलभूषण जाधव प्रकरणाच्या संदर्भात पुन्हा एकदा पाकिस्तानने नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. कुलभूषण जाधव प्रकरणाला अन्य खटल्यांशी जोडण्याचा प्रयत्न करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी भारतीय उच्चायुक्तांच्या वतीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली.जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्याची इच्छा भारताचे पाकिस्तानातील उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनल्ला व न्या. आमेर फारूक, न्या. मियांगुल हसन औरंगजेब यांच्यासमोर भारतीय उच्चायुक्तालयाचे वकील बॅरिस्टर शहानवाझ नून यांनी बाजू मांडली. त्याआधी मंगळवारी जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली असून अहलुवालिया हे इस्लामाबाद उच्च न्यायालयात त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.‘उच्च न्यायालयाचे निकालपत्र पाहता उत्तराकरिता वकील देणे गरजेचे आहे. न्याय्य पद्धतीने सुनावणी होणे गरजेचे आहे. जर अहलुवालिया न्यायालयासमोर येऊन बाजू मांडणार असतील तर त्याचे स्वागतच आहे’, असे न्या. मिनल्ला यांनी म्हटले आहे.