अखेर पंजशीर खोरे तालिबान्यांच्या ताब्यात ; गव्हर्नर हाऊसवर फडकवला झेंडा

तालिबानी लढाऊंना कोणत्याही प्रकारे पंजशीर काबीज करायचे होते. लढाई मसूदने सुरू केली होती, त्यामुळे तालिबान्यामध्ये संताप होता. या रागाच्या आणि बळाचा वापर करत तालिबानी लढाऊंनी पंजशीर काबीज केले.

    काबूल: अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबान्यांनी(Taliban) कब्जा मात्र तरीही पंजशीर (Panjshir)मधील रेजिस्टन्स फोर्सच्या सेनानींनी तालिबानला कडवी झुंज दिली. मात्र अखेर पंजशीर तालिबान्यांकडून हार पत्करावी लागली आहे. तालिबान्यांनी पंजशीर येथील गव्हर्नर हाऊसवरही आपला झेंडा फडकावला आहे. यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबानने ध्वज फडकवतानाचा एक व्हिडिओही जारी केला. तालिबानच्या दाव्यानंतरही विरोधी दलाने पंजशीर खोऱ्यात युद्ध सुरूच राहील असे म्हटले आहे.

    अफगाणिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार, पंजशीरमधील प्रतिरोधक दलाच्या तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. हे हल्ले पाकिस्तानी वैमानिकांनी केले. पंजशीरमध्ये, प्रमुख प्रतिकार नेता आणि माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह राहत असलेल्या घराला रविवारी हेलिकॉप्टरनेही धडक दिली.

    पंजशीर रेझिस्टन्सने तालिबानशी शांतता चर्चेचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी त्यांनी पंजशीर आणि अंद्राबमध्ये तालिबानी हल्ले थांबवण्यासाठी एक अट घातली होती. मात्र तालिबान बळकट स्थितीत होता. तालिबानी लढाऊंना कोणत्याही प्रकारे पंजशीर काबीज करायचे होते. लढाई मसूदने सुरू केली होती, त्यामुळे तालिबान्यामध्ये संताप होता. या रागाच्या आणि बळाचा वापर करत तालिबानी लढाऊंनी पंजशीर काबीज केले.