संसदेतील अश्लिल कृत्यांचे फोटो, व्हिडीओ लीक झाल्याने ऑस्टेलियातील लोक उतरले रस्त्यावर

खासदारांसाठी हायप्रोफाईल वेश्यादेखील संसदेत आणल्या जातात. संसदेतील कर्मचारी नेहमी एकमेकांसोबत खासगी फोटो शेअर करतात. संसदेत अशी संस्कृती बनलीय की पुरुष जे हवे ते करू शकतात.

    ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये प्रशासनातील अधिकारी अश्लिल कृत्यांमध्ये गुंग असल्याचे फोटो, व्हिडीओ लीक झाल्याच्या घटनेने ऑस्ट्रेलियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एखाद्या देशासाठी पवित्र मानली जात असलेल्या संसदेमध्ये घडालेल्या या प्रकारच्या घटनेचे विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला आहे.
    ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र The Australian आणि चॅनेल१० ने संसदेतील या अश्लिल कृत्याचे व्हिडीओ जारी केले आहेत. हे व्हिडीओ एका व्हिसलब्लोअरने लीक केले आहेत. टॉम नावाच्या व्हिसलब्लोअरने ऑस्ट्रेलिया मीडियाला सांगितले की, सरकारी अधिकारी आणि खासदार नेहमी संसदेतील प्रेयर रुमचा वापर सेक्ससाठी करतात.
    खासदारांसाठी हायप्रोफाईल वेश्यादेखील संसदेत आणल्या जातात. संसदेतील कर्मचारी नेहमी एकमेकांसोबत खासगी फोटो शेअर करतात. संसदेत अशी संस्कृती बनलीय की पुरुष जे हवे ते करू शकतात. संसदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने कायदा मोडल्याचे वाटत नाही, परंतू नैतिकदृष्या ते उघडे पडले आहेत, असे टॉमने सांगितले.हा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर एका स्टाफला लगेचच हटविण्यात आले आहे. सरकारने सांगितले की, कारवाई केली जाणार आहे.
    कॅबिनेट मंत्री करेन एन्ड्रूज यांनी सांगितले की, आता मी आणखी गप्प राहू शकत नाही. महिला विभागाच्या मंत्री मैरिस पैने यांनी सांगितले की, संसदेतील या कल्चरबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.