आई-मुलीच्या भांडणामुळे पाळीव कुत्र्यांनी केला हल्ला, महिलेचा मृत्यू; न्याय व्यवस्थेने मालकाला ठरवले दोषी

ब्रिटनमध्ये पाळीव प्राण्यांबाबत असा कायदा आहे की, घरातील पाळीव प्राण्यांना त्यांच्या मालकांना नीट सांभाळता येत नसेल किंवा त्या प्राण्यांना राग येऊन ते स्वत:वरील नियंत्रण गमावून दुसऱ्यांवर हल्ला करत असतील तर याची शिक्षा मालकाला भोगावी लागते. अशाच प्रकारची ही घटना आहे.

  घरातील दोन पाळीव कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला केल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ब्रिटन येथे घडली आहे. या घटनेत तिच्या नवऱ्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

  ब्रिटनमध्ये पाळीव प्राण्यांबाबत असा कायदा आहे की, घरातील पाळीव प्राण्यांना त्यांच्या मालकांना नीट सांभाळता येत नसेल किंवा त्या प्राण्यांना राग येऊन ते स्वत:वरील नियंत्रण गमावून दुसऱ्यांवर हल्ला करत असतील तर याची शिक्षा मालकाला भोगावी लागते. अशाच प्रकारची ही घटना आहे.

  ब्रिटनमधील एलाएने स्टॅनली (४४) असे पाळीव कुत्र्यांनी हल्ला केलेल्या महिलेचे नाव आहे. स्टॅनलीची मुलगी एकदा बाहेरून आल्यावर तिचे आणि स्टॅनलीचे भांडण झाले. त्यावेळी त्यांनी घरात पाळलेले बुलडॉग ब्रीड जातीचे कुत्रेही तिथेच होते. त्यातील मेल डीजे बुलडॉगने स्टॅनलीवर हल्ला केला. ते पाहून फिमेल बुलडॉगनेही हल्ला करून चावा घ्यायला सुरुवात केली. त्या दोघांनाही थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी माघार घेतली नाही.

  शेवटी शेजाऱ्यांनी दगड मारून या कुत्र्यांना स्टॅनलीपासून दूर केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्टेनलीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, अशी माहिती या महिलेच्या मुलीने न्यायालयाला दिली आहे.

  ही घटना २०१९ साली घडलेली असून याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू होती. यापूर्वी २०१६ साली त्यांच्या पाळीव कुत्र्याने दुसऱ्या पाळीव कुत्र्याच्या मालकावर हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केले होते. आता त्यांच्या पत्नीवरच त्यांच्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या घटनेबाबतही स्टॅनलीच्या नवऱ्याला दोषी ठरवण्यात आले होते.

  याबाबत न्यायालयात साक्ष देण्यासाठी उपस्थित असलेल्या तज्ज्ञांनी असे सांगितले की, बुलडॉग जातीचे कुत्रे शिकारी प्रवृत्तीचे असतात, मात्र मालकांवर त्यांची निष्ठा असते. त्यामुळे जेव्हा त्यांचा मालक संकटात आहे, असे त्यांना जेव्हा वाटते. तेव्हा ते संतापून हल्ला करतात. त्या वेळीही असेच घडले होते जेव्हा स्टॅनली मुलीच्या अंगावर ओरडत होती. त्यामुळे या कुत्र्यांनी तिच्या आईवर हल्ला केला.