Petrol in Nepal is Rs 21 cheaper than in India; Cheap to them then expensive to us?

बिहारमध्ये पेट्रोल ९५ रुपये लिटर आहे. भारतापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर नेपाळच्या सीमेत पेट्रोल २३.५५ रुपये व डीझल २१.९८ रुपये स्वस्त आहे. यामुळे अनेक जण नेपाळमध्ये जाऊन पेट्रोल खरेदी करतात.

    दिल्ली : भारतातूनच नेपाळमध्ये पेट्रोल निर्यात होते. तरी देखील नेपाळमध्ये पेट्रोल भारतापेक्षा २१ रुपयांनी स्वस्त आहे. यामुळे त्यांच्याकडे स्वस्त मग आपल्याकडेच महाग का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    भारतच नेपाळला पेट्रोलचा पुरवठा करते. तरीही नेपाळ आणि भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सरासरी २१ ते २५ रुपयाचा फरक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आखाती देशांमधून नेपाळला इंधन पुरवते. तेलाच्या बदल्यात नेपाळ आणि भूतान हे दोन देश भारताला डॉलर देतात.

    बिहारमध्ये पेट्रोल ९५ रुपये लिटर आहे. भारतापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर नेपाळच्या सीमेत पेट्रोल २३.५५ रुपये व डीझल २१.९८ रुपये स्वस्त आहे. यामुळे अनेक जण नेपाळमध्ये जाऊन पेट्रोल खरेदी करतात.

    तसेच भारत नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणात इंधनाची तस्करी होत आहे. इंडो नेपाळ बॉर्डरचे पश्चिमी चंपारण, सीतामढ़ी, मधुबनी, अररियाचे नेपाळ सीमेजवळील १५० पेट्रोल पंपावरुन रोज सुमारे ४ लाख लिटर नेपाळी इंधन बिहारच्या गाड्यात भरले जात आहे. येथे मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डीझलचा काळाबाजार होत आहे.

    भारत, रिफायनरी फी आणि खरीद मूल्यावरच नेपाळला इंधनाचा पुरवठा करते. नेपाळमध्ये फक्त एकच टॅक्स आकाराला जोते. तो देखील भारताच्या एक्साइज ड्यूटीपेक्षाही कमी आहे. यामुळेच नेपाळमध्ये पेट्रोल-डिझल स्वत दरात मिळते.