घोड्यांवरही लैंगिक अत्‍याचार; लैंगिक संबंधासाठी होतेय मोठ्याप्रमाणावर खरेदी

जिनेव्हा. स्वित्झर्लंडमध्ये घोड्यांवरील लैंगिक अत्याचारात वाढ झाली असून देशभरात किमान असे १०००० विकृत आहेत जे घोड्यांवर बलात्कार करीत आहेत, असे मत प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी मांडले आहे.

तीन दिवसांमध्ये किमान एक तरी घोडा लैंगिक अत्याचाराला बळी पडत आहे, असे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी १०५ जणांना घोड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी शिक्षा करण्यात आली आहे. यापेक्षा भयावह गोष्ट म्हणजे घोड्यांवर अत्याचार झालेले हे कळत देखील नाहीत त्यामुळे नेमका आकडा हजारोंच्या वर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी १७०९ केसेस दाखल झाल्या आहेत. स्वित्झर्लंडमध्ये घोड्यांची संख्या ११०००० आहे. सुमारे १८००० फार्ममध्ये हे घोडे राहतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशात प्राण्यांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारामध्ये कुत्रे आणि घोड्यांचे प्रमाण अधिक आहे. अनेक लोक आपल्या पाळीव कुत्र्यावर अत्याचार करतात. घोड्यांपेक्षा पाळीव प्राण्यांवर अत्याचार करणे तुलनेने सोपे असते अशी कबुली काही लोकांनी दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, घोड्यांविषयी समाजात वाढत चाललेले लैंगिक आकर्षण ही सरकारची डोकेदुखी बनत चालली आहे. भारतात देखील प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करतानाच्या घटना घडल्या आहेत.