Plan to form Taliban government completed; Arch in Baradar's hands, Akhundzada 'Supreme'

अमेरिकन सैन्य माघारीनंतर तालिबानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्यापुढील आव्हानेही बरीच आहेत. त्यांना आता कार्यरत सरकार स्थापन करायचे आहे. अमेरिकेने मदत कपात केल्यानंतर आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवल्यानंतर नवीन तालिबान नेत्यांना आर्थिक संकट टाळावे लागेल. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी असलेले गृहयुद्ध टाळावे लागेल. अखुंदजादा सध्या कंधारमध्ये आहेत, जिथे त्यांनी तालिबान आणि इतर अफगाण नेत्यांसह तीन दिवसीय परिषदेचे नेतृत्व केले.

  काबुल: अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याच्या एक दिवसानंतर तालिबानची सरकार स्थापनेची योजना पूर्ण झाली आहे. तालिबान आणि अफगाणिस्तानच्या इतर नेत्यांमध्ये सरकार स्थापनेच्या सूत्रावर सहमती झाली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तालिबान आणि इतर अफगाण नेते यांच्यात तालिबानच्या सर्वोच्च आध्यात्मिक नेत्याच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आणि मंत्रिमंडळाच्या निर्मितीवर एकमत झाले आहे. यानुसार मुल्ला बरादर हे सरकारचा मुख्य चेहरा असतील तर हैबतुल्लाह अखुंदजादा गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख असतील.

  तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमी यांनी सांगितले की, तालिबानचे सर्वोच्च कमांडर हैबतुल्लाह अखुंदजादा कोणत्याही प्रशासकीय परिषदेचे सर्वोच्च नेते असतील. तालिबानचा मुख्य सार्वजनिक चेहरा आणि अखुंदजादाच्या तीन प्रतिनिधींपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरदार हे नवीन सरकारचा मुख्य चेहरा असू शकतात. म्हणजेच नवीन सरकारची कमान बरदार यांच्या हातात असेल आणि अखुंदजादा त्याचे प्रमुख असतील, असे त्यांनी सांगितले.

  करीमी म्हणाले की इस्लामिक अमिरातचे नेते (अफगाणिस्तानचे नवीन नाव), मागील सरकारचे नेते आणि सर्वसमावेशक अफगाणिस्तान सरकार बनवण्याबाबत इतर प्रभावी नेत्यांशी चर्चा करण्याची फेरी अधिकृतपणे संपली आहे. सरकार स्थापनेबाबत त्यांच्यात एकमत झाले आहे. आम्ही काही आठवड्यांत नव्हे तर काही दिवसांत कार्यरत मंत्रिमंडळ आणि सरकारची घोषणा करणार आहोत.

  असे मानले जाते की तालिबान त्यांच्या सरकारबद्दल कोणतीही घोषणा करण्यापूर्वी अमेरिकन सैन्याच्या संपूर्ण माघारीची वाट पाहत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, अखुंदजादा आणि बरदार लवकरच काबुलमध्ये लोकांसमोर येतील.

  अमेरिकन सैन्य माघारीनंतर तालिबानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्यापुढील आव्हानेही बरीच आहेत. त्यांना आता कार्यरत सरकार स्थापन करायचे आहे. अमेरिकेने मदत कपात केल्यानंतर आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवल्यानंतर नवीन तालिबान नेत्यांना आर्थिक संकट टाळावे लागेल. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी असलेले गृहयुद्ध टाळावे लागेल. अखुंदजादा सध्या कंधारमध्ये आहेत, जिथे त्यांनी तालिबान आणि इतर अफगाण नेत्यांसह तीन दिवसीय परिषदेचे नेतृत्व केले.

  अफगाणिस्तानमध्ये तालिबानने मिळवलेल्या विजयासंदर्भात ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेने तालिबानचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर ‘अल-कायदा’ने काश्मीर आणि अन्य काथकथित इस्लामिक भूभाग हा इस्लामच्या शत्रूंच्या ताब्यातून मुक्त करण्यासंदर्भात भाष्य केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच ‘अल-कायदा’ने त्यांचे अभिनंदन करणारा संदेश जारी केला.

  अल-कायदाने अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने घेतलेली माघार घेण्याचा संबंध हा कथाकथित इस्लामिक प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवण्याशी जोडला. लेवंत, सोमाविया आणि येमेनलाही मुक्त करण्याबद्दल या दहशतवादी संघटनेने तालिबानचे अभिनंदन करताना भाष्य केले आहे. ‘अफगाणिस्तानमध्ये अल्लाहने मिळवून दिलेल्या विजयाबद्दल इस्लामिक उम्माचे अभिनंदन’ या मथळ्याखाली अल-कायदाने संदेश जारी केला.