पंतप्रधान मोदींचा बांग्लादेश दौरा, परराष्ट्र खात्याची घोषणा, बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला राजकीय महत्त्व

पंतप्रधान मोदी हे २६ आणि २७ मार्च या दिवशी बांग्लादेश दौऱ्यावर असतील. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणानंतर या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. कोरोना आणि लॉकडाऊननंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार असल्याची अधिकृत घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलीय. पंतप्रधानांच्या दौऱ्याचं वेळापत्रकही जाहीर झालं असून मोदींच्या या दौऱ्याकडं बंगाल निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पाहिलं जातंय. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहेत.

    पंतप्रधान मोदी हे २६ आणि २७ मार्च या दिवशी बांग्लादेश दौऱ्यावर असतील. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणानंतर या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. कोरोना आणि लॉकडाऊननंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता.

    आता पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडं पाहिलं जातंय. २७ तारखेला पंतप्रधान मोदी मतुआ समाजाशी संबंधित काही ठिकाणांना भेटी देणार आहेत. बंगालमध्ये मतुआ समाजाचं चांगलंच प्राबल्य असून या समाजाची मतदारसंख्याही मोठी आहे. पश्चिम बंगालमध्ये ७० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये मतुआ समाजाचं प्राबल्य आहे.

    बांगलादेशमधील गोपाळगंज या ठिकाणी असणाऱ्या मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळासह अनेक जागांना मोदी भेट देणार आहेत. या जागांना भेट देणारी मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बतुआ समाजाचे नेतेदेखील मोदींसोबत दिसणार आहेत.

    याचा किती परिणाम मतदानावर होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा बांगलादेश दौरा भाजपच्या पथ्यावर पडेल, असं सांगितलं जातंय.