human bones

एका आरोपीच्या घरात चक्क ३,७८७ मानवी हाडे(3787 human bones found in house) सापडली. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर मेक्सिको(Serial Killing In Mexico) परिसरात दहशत पसरली आहे.

    उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये(Mexico) एका नरभक्षक माणसाला पोलिसांनी अटक केली आहे. एका आरोपीच्या घरात चक्क ३,७८७ मानवी हाडे(3787 human bones found in house) सापडली. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर मेक्सिको(Serial Killing In Mexico) परिसरात दहशत पसरली आहे. हा नरभक्षक सिरीयल किलर पेशाने कसाई असून संधी मिळाल्यावर तो लोकांना ठार मारायचा.

    या कसाई आणि नरभक्षक असलेल्या माणसाचे नाव अँड्रेस आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी संधी मिळताच लोकांना मारून टाकायचा. सीरियल किलरच्या घरी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने२० बेपत्ता लोकांचे अवशेष शोधून काढत हजारो हाडे मिळवली असल्याचे समजते.

    नरभक्षक अँड्रेस यांच्या घरात ही हाडे काँक्रीटच्या फरशीखाली सापडली. मृतदेहांचे अगदी लहान तुकडे केले गेले असल्याचे फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

    अँड्रेस राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये पोलीस आणखी खोदकाम करणार आहे. आरोपीच्या घरातून गायब झालेल्या लोकांची ओळखपत्रे, कपडे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यामुळे हे स्पष्ट झाले की आरोपी खूपदा अशा प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपी मारेकरी पकडला गेला कारण त्याने पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचालाच शिकार केले. त्यांना तो वैयक्तिक ओळखत होता. पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आरोपी सीरियल किलर अँड्रेसबरोबर शॉपिंग ट्रिपवर गेली होती आणि त्याच दिवशी ती गायब झाली. पत्नी परत आली नसल्यामुळे तिच्या पतीला आरोपीवर संशय आला.

    आरोपीला पोलिसांनी पुराव्यासोबत न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने एका महिलेला सुंदर दिसत असल्यामुळे मारले.दरम्यान आरोपीने आजारी असल्याचे नाटक केले.