या कारणामुळे झाली कोरोना विषाणूची उत्पत्ती, चीन करतंय अहवालात फेरफार ?

कोविड -१९ च्या उत्पत्ती(corona virus source) नक्की कुठून झाली याबाबत डब्ल्यूएचओ आणि चीन यांनी एकत्रितपणे अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार कोरोना विषाणू वटवाघूळांपासून मनुष्यापर्यंत दुसऱ्या प्राण्यामार्फत संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे.

    कोविड -१९ च्या उत्पत्ती(corona virus source) नक्की कुठून झाली याबाबत डब्ल्यूएचओ आणि चीन यांनी एकत्रितपणे अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार कोरोना विषाणू वटवाघूळांपासून मनुष्यापर्यंत दुसऱ्या प्राण्यामार्फत संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे. प्रयोगशाळेतून या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाही.

    या अहवालाच्या प्रकाशनाला वारंवार विलंब झाला आहे. चीनवर  असलेला कोरोना महामारी पसरवण्याचा आरोप टाळण्यासाठी चीनी संशोधक अहवालामध्ये काही फेरफार करून वेगळे निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न करत होते का,असा प्रश्न उपस्थित होतो.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्याच्या शेवटी सांगितले की “येत्या काही दिवसांमध्ये हा अहवाल प्रकाशनासाठी तयार होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

    जिनेव्हा येथे असलेल्या डब्ल्यूएचओ सदस्य देशातील एका अधिकाऱ्याकडून सोमवारी असोसिएटेड प्रेसला अहवालाची अंतिम आवृत्ती प्राप्त झाली. हा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच अजूनही बदलला जाऊ शकतो का हे समजू शकले नाही. अधिकाऱ्याला त्यांची ओळख पटवायची नव्हती कारण प्रकाशनापूर्वी अहवाल दाखवण्याचा अधिकार त्यांना नव्हता.