मृत्यूला घाबरू नका, युद्धासाठी सज्ज राहा; राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे सैनिकांना आवाहन

भारत आणि चीनमध्ये (India-China) तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान,  राष्ट्रपती शी जिनपिंग (President Xi Jinping) यांनी मृत्यूला घाबरू नये, त्यांनी युद्धाची तयारी करावी, असे आवाहन सैनिकांना केले आहे.  

पूर्व लडाख (Ladakh) सीमेवर भारत-चीनमध्ये (India-China) तणाव कायम आहे. तणाव कमी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सहमती दर्शवल्यानंतरही चीनचे सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान,  राष्ट्रपती शी जिनपिंग (President Xi Jinping) यांनी मृत्यूला घाबरू नये, त्यांनी युद्धाची तयारी करावी, असे आवाहन सैनिकांना केले आहे.

राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैनिकांना केलं आवाहन

सैनिकांनी मृत्यूला घाबरू नये, त्यांनी युद्धाची तयारी करावी आणि युद्धासाठी सज्ज राहावे, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैनिकांना केले आहे. युद्ध आपल्यालाच जिंकायचे आहे, या भावनेने सैनिकांनी तयारीला लागावे, असे ते म्हणाले. मिलिट्री कमांडर्सलाना मार्गदर्शन करताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून युद्धाचे संकेत मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

नेपाळ आणि तिबेट मध्येही चीन विस्तारवादी धोरण राबवत त्यांचा भूभाग बळकावत आहे. त्यामुळे तणावात भर पडली असतानाच जिंनपिंग युद्धाची भाषा करत असल्याने त्याला महत्त्व आले आहे.