पंतप्रधान बोरिस जॉन्सन वयाच्या ६० ला तिसऱ्यांदा बोहल्यावर ; ३३ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत जुलैमध्ये बांधणार लगीनगाठ

यापूर्वी जॉन्सन यांनी दोनवेळा लग्न केले होते. मात्र, हे दोन्ही संसार फारकाळ टिकले नव्हते. त्यानंतर आता बोरिस जॉन्सन कॅरी सायमंडस यांच्यासोबत संसाराच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत

    लंडन: ‘प्रेमाला वयाचे बंधन नसते’ असेच काहीसे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या बाबतीत घडलेले पाहायला मिळत आहे. वयाच्या साठीकडे झुकलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK PM Boris Johnson) (५६) आपल्या ३३ वर्षीय गर्लफ्रेंड कॅरी सायमंडस हिच्या सोबत येत्या ३० जुलैला विवाह बंधनात (wedding ) अडकणार आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस यांचा साखरपुडा झाला होता. गेल्याचवर्षी या दोघांना मुलगा झाला असून त्याचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जॉन्सन यांनी दोनवेळा लग्न केले होते. मात्र, हे दोन्ही संसार फारकाळ टिकले नव्हते. त्यानंतर आता बोरिस जॉन्सन कॅरी सायमंडस यांच्यासोबत संसाराच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.

    विवाह सोहळ्यासाठीआपल्या नातेवाईक आणि मित्रांना निमंत्रणं पाठवायला सुरुवात केल्याचे समजते. ‘द सन’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या दोघांचा विवाह नक्की कुठे होणार, हे अद्याप समजलेले नाही. सद्यस्थितीला वर्षीय बोरिस जॉन्सन गर्लफ्रेंडसह डाऊनिंग स्ट्रीट येथे राहत आहेत.

    वन्यजीव संरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅरी सायमंडस या ‘इंडिपेंडंट’ दैनिकाच्या संस्थापक मॅथ्यू सायमंडस आणि वकील जोसेफिन मॅकफी या दाम्पत्याची कन्या आहेत. ३३ वर्षांच्या कॅरी यांचे बालपण लंडनमध्येच गेले आहे. त्यांनी वार्विक विद्यापीठातून कला, इतिहास आणि नाटकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कॅरी यांनी खासदार जॅक गोल्थस्मिथ यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली होती. २०१० साली हुजूर पक्षाच्या माध्यम अधिकारी म्हणून निवड झाली. या काळात बोरिस जॉन्सन लंडनच्या महापौरपदी निवडून आले. यामध्ये कॅरी सायमंडस यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर कॅरी यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जॉन व्हिटिंगडेल यांच्यासोबत काम केले. पुढील काळात कॅरी सायमंडस हुजूर पक्षाच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख झाल्या.