पंतप्रधान मोदींची जो बायडेन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा, अमेरिकेकडून भारताला मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. तसंच मदतीचं आश्वासन दिल्याबद्दल आपण जो बायडन यांचे आभार मानल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

    कोरोना संकटात अमेरिकेने भारताला मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेने कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल भारताला पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. याबाबतची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत दिली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. तसंच मदतीचं आश्वासन दिल्याबद्दल आपण जो बायडन यांचे आभार मानल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

    जो बायडेन यांच्याबरोबरील चर्चा फलद्रुप झाली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या कोरोना स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडेन यांचे आभार मानले, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय भारताकडून करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.