pub with a notes attached to ceiling

फ्लोरिडामध्ये(Florida) एक असा पब(Pub In Florida) आहे जिथे नोटा छताला लटकलेल्या आहेत. या पबमध्ये लोक खास पैसे पाहाण्यासाठी येतात.

    पबमध्ये अनेकजण मजा आणि डान्स करण्यासाठी येत असतात. मात्र तुम्हाला माहितेय का फ्लोरिडामध्ये(Florida) एक असा पब(Pub In Florida) आहे जिथे  छताला नोटा लटकलेल्या आहेत. या पबमध्ये लोक खास पैसे पाहाण्यासाठी येतात.

    तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा संपूर्ण पब खऱ्या नोटांनी सजला आहे. याच्या छताला आणि भिंतींना मिळून तब्बल २ मिलियन डॉलर म्हणजेच २० लाख रुपये लटकलेले (Pub Is Decorated With Two Million Dollars) आहेत. मॅकगुएर यांचा हा आयरिश पब आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, १९७७ मध्ये मॅकगुएर आणि त्यांची पत्नी मोली यांनी हे पब सुरू केलं. यावेळी त्यांच्या पत्नीला पहिली टीप म्हणून १ डॉलर मिळाला. पहिली टीप असल्यानं त्यांनी यावर तारीख लिहित ही नोट पबमध्ये चिटकवली. हे पाहून तिथे येणाऱ्या इतरही ग्राहकांनी टीप देत यावर तारीख आणि आपली सही करुन नोटा पबमध्ये चिटकवण्यास सुरुवात केली. हळुहळू हा संग्रह वाढत गेला.

    हा पब १५,००० स्क्वेअर फूटमध्ये असलेल्या या पबच्या छताला डॉलर लटकवून जागा संपल्यानंतर आता भिंतींनाही नोटा चिटकवण्यात आल्या आहेत.

    पबच्या मालकानं सांगितलं, की प्रत्येक वर्षी आम्ही हे पैसे मोजतो आणि यासाठी आम्ही करही भरतो. ही आमची संपत्तीच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  एकदा पबमधीलच एका कर्मचाऱ्यानं याठिकाणी लटकलेले पैसे चोरले होते, याशिवाय काही ग्राहकांनीही पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र या नोटा खऱ्या असूनही त्या खर्च करता येत नाहीत.कारण यावर काळ्या मार्करनं केलेल्या सह्या आणि लिहिलेला मजकूर. शहरात या पबबाबत सर्वांनाच माहिती असल्यानं या नोटा बघितल्यावर त्यांची ओळख पटते. यामुळे विक्रेते याबाबतची माहिती पबच्या मालकाला देतात.