public execution in yemen

येमेनची(Yemen) राजधानी सनामध्ये हूती विद्रोह्यांनी लहान मुलींची हत्या करणाऱ्या वडिलांना भर चौकात मृत्यूदंडाची शिक्षा(Public Execution In Yemen) दिली आहे.

    सना : येमेनची(Yemen) राजधानी सनामध्ये इराण पुरस्कृत हूती विद्रोह्यांनी लहान मुलींची हत्या करणाऱ्या वडिलांना भर चौकात मृत्यूदंडाची शिक्षा(Public Execution In Yemen) दिली आहे. सनावर ताबा मिळवलेल्या या विद्रोह्यांनी ३ आरोपींना भर चौकात गोळ्या घालून ठार मारलं.

    आरोपींचा मृत्यू झाल्यानंतर एका चादरीत गुंडाळून त्यांचे मृतदेह चौकामधून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले. ही मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असताना सुरक्षा दलातील जवान जमीनीवर पडलेल्या या आरोपींवर हसत होते. येमेनमध्ये २०१८ नंतर पहिल्यांदात अशाप्रकार जाहीरपणे तालिबानी पद्धतीने एखाद्या आरोपीला शिक्षा देण्यात आली आहे.

    ज्या आरोपींना भरचौकामध्ये मृत्यूदंड दिला त्यामध्ये ४० वर्षाचे अली अल-नामी, ३८ वर्षीय अब्दुल्ला अल-मखली आणि ३३ वर्षीय मोहम्मद अरमान यांचा समावेश होता. हे तिघेही येमेनचे नागरिक होते. सना येथील तहरीर स्वेअर येथे या तिघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी घेऊन जाताना त्यांना निळ्या रंगाचे जम्पसूट घालण्यात आले होते. त्यानंतर या तिघांनाही चौकामध्ये एका चादरीवर हात बांधून तोंड जमिनीकडे करुन झोपवण्यात आलं आणि त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

    हजारो लोकांच्या समोर हिरव्या रंगातील वर्दीमधील सेनेच्या आणि काळे हातमोजे घातलेल्या जल्लादांनी तिघांच्याही पाठीवर एके-४७ रायफलने एकामागून एक गोळ्या झाडल्या. या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मेल्यानंतर या तिघांचे मृतदेह चादरीत गुंडाळून नेण्यात आले.

    या तिन्ही आरोपींचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळ त्यांचे मृतदेह क्रेनच्या सहाय्याने चौकामध्ये लटकत ठेवण्यात आले होते. लोकांमध्ये कायद्याचे भय निर्माण व्हावे आणि त्यांनी गुन्हे करु नयेत या उद्देशाने भीती निर्माण करण्यासाठी असं केलं जातं.

    येमेन आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील संघटना आणि लष्कर हूती विद्रोह्यांविरोधात युद्ध लढत आहेत. या युद्धामध्ये आतापर्यंत येमेनमधील एक लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.