पुलित्झर पुरस्कर विजेता भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या

अफगाणिस्तानमध्ये जेव्हा डोक्यावरुन रॉकेट गेलं दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या सर्व घडामोडींची माहिती स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन देत होते. १३ जुलैला रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी केलेलं ट्विट हे त्यांचं शेवटचं ट्विट ठरलंय. ह्या ट्विटमध्येही त्यांनी कंदहारमध्ये नेमकं काय घडतं आहे याची सविस्तर माहिती दिलीय.

  पुलित्झर पुरस्कर विजेता भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांची  अफगाणिस्तानमधल्या कंदहार भागात हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. दानिश हे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॉयटर्स न्यूज संस्थेसोबत काम करता होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून सुरू असलेल्या हिंसात्मक घटना कव्हर करण्यासाठी दानिश सिद्दीकी हे अफगाणिस्तानमध्ये गेले होते. तेथील एक मिशन कव्हर करत असतानाच दानिश यांची हत्या करण्यात आली आहे.

  इथे झाली हत्या
  कंदहार प्रांतातील स्पीन बोल्डक (Spin Boldak area) भागात दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्या. तालिबानी आणि अफगाण फोर्सेस यांच्यात तुंबळ लढाई सुरु आहे. ते कव्हर करण्यासाठीच दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये होते. आणि त्यातल्याच घटना कव्हर करताना दानिश यांना संपवण्यात आले.

  दानिश सिद्दीकी यांच्या करिअरची सुरुवात टीव्ही न्यूज चॅनलचे रिपोर्टर म्हणून झाली होती. स्वत:चं पॅशन फॉलो करत फोटो जर्नलिस्ट झाले. २०१८ साली दानिश सिद्दीकींना जगप्रसिद्ध अशा पुलित्झर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. त्यांचे सहकारी अदनान आबिदींचाही सन्मान करण्यात आला. रोहींग्या शरणार्थींचं संकट दानिश सिद्दीकींनी मोठ्या प्रमाणात कव्हर केलं होतं.

   

  अफगाणिस्तानमध्ये जेव्हा डोक्यावरुन रॉकेट गेलं दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या सर्व घडामोडींची माहिती स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन देत होते. १३ जुलैला रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी केलेलं ट्विट हे त्यांचं शेवटचं ट्विट ठरलंय. ह्या ट्विटमध्येही त्यांनी कंदहारमध्ये नेमकं काय घडतं आहे याची सविस्तर माहिती दिलीय. तो संपूर्ण थ्रेड वाचण्यासारखा आहे. १३ जुलैलाच अफगाण-तालिबान लढाई कव्हर करताना सिद्दीकी हे अफगाण फोर्सेसच्या गाडीत होते. त्या गाडीवर तालिबान्यांनी रॉकेटनं हल्ला केला.