पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचे कृत्य: पाकिस्तानी मंत्र्यांनेच दिली कबुली

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या एका मंत्र्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुलवामा हल्ला पाकिस्ताननंच घडवल्याची कबुली पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांची दिली आहे.पुलवामा दहशतवादी हल्ला इम्रान खान सरकारच्या संरक्षणाखाली करण्यात आला होता . खान यांच्या नेतृत्वात पुलवामा ही एक मोठी कामगिरी होती असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

फवाद चौधरी यांच्या अगोदर इमरान खान यांच्या पक्षाच्या एका खासदाराने खुलासा केला होता की, भारताकडून हल्ला होईल या भीतीनं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं. अभिनंदन यांना सोडण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पंतप्रधान इम्रान खान यांनी हजर राहणं टाळलं. पण या बैठकीत उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री आणि लष्करप्रमुख या दोघांचाही कसा थरकाप उडाला होता, याचं वर्णन या खासदाराने यांनी नॅशनल असेंब्लीतील भाषणात केलं.त्याला प्रत्युत्तर देताना चौधरी यांनी पुलवामा हल्ल्याबाबत कबुली दिली.

पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष PTI आणि इम्रान खान यांना दिलं आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतातील पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेत भारताचे ४० जवान शहीद झाले होते. फवाद चौधरी यांनी आता पुलवामा हल्ला हे त्यांच्या पक्षाचं आणि इम्रान खान सरकारचं यश असल्याचं म्हटलं आहे. भारताला आपण त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.