पुणेरी पत्रकाराचा डोनाल्ड ट्रम्पना झटका : अवघड प्रश्नाने केले अवाक

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, मागील सोडेतीन वर्षे अमेरिकन जनतेशी खोटं बोलत अस्याचा तुम्हाला पश्चाताप होतो आहे का? या थेट बोचरा प्रश्नाने ट्रम्प यांची बोलतीच बंद केली होती.

अमेरिका : अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमिवर अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. या राष्ट्रध्यक्षांच्या निवासास्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणेरी प्रश्नाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बोलती बंद केली आहे. तसेच इतर पत्रकारही गपगार झाले. 

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, मागील सोडेतीन वर्षे अमेरिकन जनतेशी खोटं बोलत अस्याचा तुम्हाला पश्चाताप होतो आहे का? या थेट बोचरा प्रश्नाने ट्रम्प यांची बोलतीच बंद केली होती. तसेच इतर पत्रकारांतही एकच शांतता पसरली. असा प्रश्न विचारणारे पत्रकार भारतीय एस. व्ही. दाते होते. त्यांचा जन्म पुण्यात झाला असून ते अमेरिकेत स्थायिक आहेत. तसेच अमेरिकन पत्रकार आहेत. 

एस. व्ही. दाते म्हणजेच शिरिष दाते अमेरिकेत हफिंग्टन पोस्टसाठी काम करतात. ते अमेरिकेत मागील ३० वर्षांपासून पत्रकारीता करत आहेत. दाते ‘हफ पोस्ट’ चे व्हाईट हाऊस कॉरस्पॉडंट म्हणून या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. शिरिष दाते यांनी अवघड प्रश्न विचारल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

 

पत्रकार परिषद पार पडल्यानंतर पत्रकार शिरीष दाते यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हा प्रश्न विचारण्यासाठी मी गेली ५ वर्षे प्रतिक्षा करत होतो. या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनेक पत्रकार ट्रम्प यांना अवघड प्रश्न विचारत होते. परंतु दातेंनी विचारलेल्या निर्भिड प्रश्नाने एकच शांतता पसरली होती. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिले प्रश्न नीट न एकल्याने पुन्हा विचारण्यास सांगितले. पुन्हा प्रश्न विचारल्यास त्यांनी उत्तर देणे टाळल्याचे व्हिडिओत दिसत आहेत.