python in toilet

ऑस्ट्रियाच्या(Austria) ग्रेझ (Graz) शहरात ही घटना घडली आहे. पासष्ठ वर्षांची ही व्यक्ती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचासाठी गेली. ती टॉयलेट सीटवर बसली आणि काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्यांनी खाली वाकून पाहिलं तर तिथं चक्क भलामोठा अजगर(Python In Toilet) होता.

  कॅनबेरा: दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असंच प्रत्येकाला वाटतं. पण एका व्यक्तीसाठी एका नव्या दिवसाची (Bad Morning)सुरुवात खूप भयानक पद्धतीने झाली आहे. कारण या व्यक्तीच्या चक्क गुप्तांगालाच भल्यामोठ्या अजगराने (Python) चावा (Python Bites Man In Toilet) घेतला आहे. सकाळी सकाळी असं काहीतरी अनुभवायला लागेल याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.

  ऑस्ट्रियाच्या(Austria) ग्रेझ (Graz) शहरात ही घटना घडली आहे. पासष्ठ वर्षांची ही व्यक्ती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचासाठी गेली. ती टॉयलेट सीटवर बसली आणि काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्यांनी खाली वाकून पाहिलं तर तिथं चक्क भलामोठा अजगर होता.

  जवळपास दीड मीटर म्हणजे पाच फुटांचा हा साप होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. इतक्या मोठ्या अजगराने या व्यक्तीच्या गुप्तांगाला चावा घेतला (Python bites man in toilet) होता. हा अजगर आशियाई अजगर होता. जो नऊ मीटरपेक्षा जास्त लांबपर्यंत वाढतो.

  पोलिसांनी सांगितलं, या व्यक्तीने सांगितल्यानुसार तो शौचाला बसताच त्याला गुप्तांगाला कुणीतरी चिमटा काढल्यासारखं जाणवलं. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार हा अजगर या व्यक्तीच्या शेजारील घरातून टॉयलेट पाईपमार्फत आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे .

  या व्यक्तीच्या शेजारील व्यक्तीकडे अकरा साप आहेत.मात्र ते सर्व बिनविषारी आहेत.
  आपत्कालीन विभागाला बोलावून टॉयलेटमधून हा अजगर बाहेर काढण्यात आला आहे आणि त्याच्या मालकाकडे सोपवण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीला साप चावला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.