imran khan

आराखड्यामध्ये पोलिस दला महिलांची (Ladies In Police) भूमिका वाढवणे, बलात्कार प्रकरणात (Rape Case) त्वरित खटला आणि साक्षीदारांचे संरक्षण यांचा समावेश आहे. पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की ही गंभीर बाब आहे आणि या प्रकरणात होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) माध्यमांनी मंगळवारी दावा केला आहे की, पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये बलात्काराच्या दोषींना (Rape accused) रासायनिकदृष्ट्या नपुंसक (heinous punishment) करणे आणि त्वरित खटल्याची तरतूद करणाऱ्या कायद्याला तत्वतः मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कायदा मंत्रालयाने बलात्कारविरोधी अध्यादेशाचा मसुदा सादर केला. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

या आराखड्यामध्ये पोलिस दला महिलांची भूमिका वाढवणे, बलात्कार प्रकरणात त्वरित खटला आणि साक्षीदारांचे संरक्षण यांचा समावेश आहे. वृत्तानुसार पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की ही गंभीर बाब आहे आणि या प्रकरणात होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही. इम्रान खान म्हणाले, “आम्हाला आमच्या नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे लागेल.” पंतप्रधान म्हणाले की बलात्कार पीडिता निर्भयपणे तक्रारी नोंदवू शकतील आणि सरकार त्यांची ओळख लपवून ठेवेल.

लवकरच संसदेत सादर करण्यात येणार कायदा

अहवालानुसार काही संघीय मंत्र्यांनीही दोषींना सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची शिफारस केली. सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफचे खासदार फैसल जावेद खान यांनी ट्विटरवर लिहिले आहे की लवकरच हा कायदा संसदेत आणला जाईल.